पुणे- ३९ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या क्रेडाई महाराष्ट्र या फेडरेशनमधील क्रेडाई पुणे मेट्रो ही महिलांना प्रोत्साहन देणारी ही पहिली संघटनाठरली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी क्रेडाई पुणेमेट्रो या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेमध्ये महिलांसाठी नविन संधीउपलब्ध करून दिल्या आहे.क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी ही घोषणा करून महिला सक्षमीकरणामध्ये महत्वाचे पाऊल उचलले आहे.महिला विंगमध्ये रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये प्रत्यक्षात फायनान्स, मार्केटिंग,अभियांत्रिकी, नियोजन, डिझाइन, ईआरपी अंमलबजावणी आणि मानव संसाधन विकास इत्यादी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ५० महिलांचा समावेश आहे. दर्शना परमार यांना महिला विंगच्या पहिल्या संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.महिला विंगच्या सदस्यांना संबोधित करत अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. रिअल ईस्टेट क्षेत्रातही त्या अशाच कार्यरत असाव्या यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.या सदस्यांना क्रेडाई पुणे मेट्रोच्या विविध उपसमित्यांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षी निवडून येणार्या कार्यकारी
समितीमध्येही महिला विंग ने प्रतिनिधित्व करावे, असेही कटारिया यांना वाटते.उद्योगांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या या संकल्पनेचे राष्ट्रीय पातळीवरील क्रेडाई या संघटनेकडून व तिच्या सदस्यांनकडूनही कौतुक केले जात आहे.