पुणे-काँग्रेसच्या प्रवक्त्याने ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’वर गंभीर आरोप करत, ट्रस्टचे सदस्य संत आणि स्वयंसेवकांद्वारे “निधि समर्पण अभियान” राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी नाही तर एका राजकीय पक्षासाठी एकत्रित केले जात आहे, असा आरोप केला आहे.याला प्रतिउत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “मला काँग्रेसच्या या आरोपांबद्दल जराही आश्चर्य वाटले नाही कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे.”
राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा प्रतिप्रश्नही यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसला केला आहे.

