कॉस्मिक बीटस् इव्हेन्टस् तर्फे बेला शेंडे लाइव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन
पुणे : कॉस्मिक बीटस् इव्हेन्टस् तर्फे बेला शेंडे लाइव्ह इन कॉन्सर्ट एक सुरेल हितगूज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द पार्श्वगायिका बेला शेंडे यांची विविध लोकप्रिय गाणी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार 18 जून 2016 रोजी,सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत खांडकेकर,सहगायक संदिप उबाळे,वाद्यवृंद संयोजन अविनाश चंद्रचूड आणि निर्मिती संयोजन अमित जोशी पाहणार आहेत.
बेला शेंडे लाइव्ह इन कॉन्सर्ट एक सुरेल हितगूज हा कार्यक्रम एका वेगळ्या दृकश्राव्य रूपात सादर होईल.काही किस्से,गप्पा गोष्टींतून हा सांगितिक कार्यक्रम उलगडेल.अगदी त्यांच्या मराठीतील लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपासून ते लावणीपर्यंत,काही मोजकी हिंदी गाणी (ओल्ड मेलेडीज्) ते अनप्लग्ड गाण्यांपर्यंत सगळचं काही या कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळेल.काही गाणी थोड्या अनोख्या ढंगात सादर होतील.
या कार्यक्रमाची तिकीट विक्री 12 जून पासून सकाळी 9 ते 11:30 तर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड,हर्बल हेरिटेज,नवी पेठ येथे होणार आहे.फोन बुकींगसाठी (12 जूनपासून) 9595830555 या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच ऑनलाईन बुकींगसाठी www.ticketees.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
कॉस्मिक बीट्स स्टुडीओ हा एक दृक-श्राव्य रेकोर्डिंग स्टुडीओ असून, येथे जिंगल्स, अल्बम्स, माहितीपट, चित्रपट ई .उपक्रम घेतले जातात. दिलीप प्रभावळकर, स्वर्गीय श्रीमती जयमालाबाई शिलेदार, रवींद्र खरे ई. दिग्गज कलावंतांनी या स्टुडीओ मध्ये रेकोर्डिंग केले आहे. या स्टुडीओ मध्ये हिंदी व मराठी चित्रपट संगीत, एकल व द्वंद वाद्यसंगीत तसेच फ्युजन व शास्त्रीय वाद्यासंगीत तसेच विषय आधरित संगीत कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येते. उस्ताद अल्लारखा खांसाहेब आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचे शिष्य असलेले श्री . अमित जोशी व डॉ. संजीव शेंडे आणि आरती ठाकूर-कुंड
लकर यांच्या शिष्या मीनलता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व उपक्रम घेतले जातात.