रुग्णसंख्या जास्त दाखविल्याचा नगरसेवक विशाल तांबेंच्या दाव्याने खळबळ(व्हिडीओ)

Date:

पुणे : धनकवडी -सहकारनगर क्षत्रिय कार्यालय अंतर्गत कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त दाखविल्याचा दावा आज राष्ट्रवादीचे धनकवडीतील नगरसेवक विशाल तांबे यांनी केल्याने खळबळ उडाली.महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडून प्रसिद्ध होणाऱ्या मॅपमधील आकडेवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे तांबे यांनी सांगितल्याने आकडेवारी पुन्हा-पुन्हा तपासण्याचा आदेश स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाकडून रुग्णांच्या संख्येचा आढावा घेणारा नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शहरात सुमारे 42 प्रभाग आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ते समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांत (क्र.35, 39,40, 42) 5 आणि 4 मे रोजी 124 रुग्ण असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर, 1, 2, 3 मे रोजी प्रत्येकी 121 रुग्ण असल्याचे म्हटले होते. मात्र, 26 ते 29 एप्रिल दरम्यान दररोज 62 ते 64 रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, स्मार्ट सिटीतील अधिकाऱयांबरोबर 30 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. त्यामुळे त्या दिवशी स्मार्ट सिटी प्रशासनाने नकाशा प्रसिद्ध केला नाही. मात्र, 1 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नकाशात धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील चार प्रभागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 64 वरून 121 वर पोचल्याचे दिसून आले. सुमारे 57 रुग्ण कोठून वाढले, असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींना पडला.

स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून, आरोग्य विभागाकडून आकडेवारी गोळा केली तेव्हा या चारही प्रभागांतील रुग्ण संख्या सुमारे 70 असल्याचे दिसून आले. त्यांची यादीही त्यांनी मिळविली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाकडे 121 रुग्णांबाबत विचारणा केली असता, ते खुलासा करू शकले नाही. तांबे यांनी हे तपशील ‘सकाळ’कडे दिले.

याबाबत अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आकडेवारीच्या संकलनात काही वेळा त्रुटी राहू शकतात. त्यामुळेच त्यांची पुन्हा-पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. आकडे नेमके स्पष्ट झाल्याशिवाय नकाशा प्रसिद्ध केला जाणार नाही. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाबत नेमका प्रकार काय झाला आहे, याची खातरजमा केली जाईल.

नगरसेवक तांबे म्हणाले, कोरोनाची रुग्ण संख्या 64 असून ती एकदम 121 वर कशी पोचली, याचा शोध घेतला असता, आकडेवारीत गफलत झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्याच आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंर्तगत राहणारे 70 रुग्ण आहेत. त्यात प्रभाग 35 मधील 44, 39 मधील 12, 40 मधील 6, आणि 42 मधील 8 रुग्ण आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या नकाशात 124 रुग्ण कसे काय दाखविण्यात आले, याबद्दल आश्चर्य वाटत आहे. म्हणूनच त्या बाबत आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...