उंडरी गावच्या नागरी विकास कामांकरिता 1 कोटी रुपयांचा निधी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी केला जाहीर

Date:

पुणे-पुणे महानगर पालिकेत नव्यानं समाविष्ठ झालेल्या गावांमध्ये नागरी विकास कामे मोठया प्रमाणावर भाजपा राबवणार असल्याचे प्रतिपादन उंडरी गावचे प्रभारी भाजपा माजी सभागृह नेता, नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी उंडरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
भाजप चेराजेंद्र भिंताडे,अविनाश टकले,दादा कड,ओंकार होले,हनुमंत घुले यांनी पूरग्रस्तांना मदत,कोव्हिडं योद्धा सन्मान,मनपा कर्मचारी,माजी सैनिक,निवृत्त पोलीस सन्मान, रिक्षाचालकाना सीएनजी कुपन वाटप,जेष्ठ ग्रामस्थ,10 वि 12 वि उत्तीर्ण विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार,गरजू कुटुंबांना किराणा वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,यावेळी भिमाले हे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर,
योगगुरू दीपक शिळीमकर,दादा कड, अक्षय टकले, जयश्री पुणेकर,भाजप डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ तेजस्विनी अरविंद,प्रकाश होले,विजय चौधरी,कैलास पुणेकर,अनिल होले,दत्तोबा होले आदी मान्यवर आणि जेष्ठ ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाजप कार्यकर्त्यांनी उंडरी गावच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले असून उंडरी गावात विविध विकास कामाकरिता 1 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे यावेळी श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
माजी आमदार योगेश टिळेकर यावेळी बोलताना म्हणाले ‘ नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आघाडी सरकारच्या सत्ताधाऱ्यानी नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न न केल्याने या गावांचा विकास खुंटला आहे, भाजप या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांना निधी उपलब्ध करून देत असल्याने या गावांचा चेहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले ‘ उंडरी गावात शहरीकरण वेगाने वाढत असून पाणी,ड्रेनेज,
रस्ते आदी समस्या सोडवण्यात स्थानिक सत्ताधार्यांना अपयश आले आहे,आता पुणे मनपात समावेश झाल्याने हे प्रश्न भाजपच्या माध्यमातून सुटतील आणि उंडरी परिसराचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकांत भिंताडे,सचिन भिंताडे,तुषार भिंताडे,
भानुदास होले,विठ्ठल भिंताडे,निलेश भिंताडे,संकेत भिंताडे,अरुण आंबेकर, प्रकाश आबनावे,
काशिनाथ कड आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पुणेकर यांनी केले तर आभार गौरी फुलावरे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...