पुणे-पुण्यातील कात्रज येथील प्रभाग क्र ३८ अंतर्गत उत्कर्ष सोसायटीच्या ३० फूट मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद होऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले .नगरसेवक प्रकाश कदम यांनी येथील एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सुरु करताच या ठिकाणी स्थानिक भाजपच्या नगरसेविका आल्या आणि तिथेच या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच विवाद सुरू झाल्याने . उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या पायाखालची वाळू घसरल्याने केलेला एक स्टंट होता , वास्तविक पाहता आपण या रस्त्यासाठी गेल्यावर्षी निधी मंजूर करवून घेतला पण कोरोना चा काळ आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे हे काम रखडले होते .ते आता आपण करवून घेत आहोत असे प्रकाश कदम यांनी सांगितले अधिकारीवर्ग महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने भाजपाच्या दबावाखाली वागत असला तरी स्थानिक भागात नागरिकांना सातत्याने कोण विकास कामे करतो कोण मदतीला धावतो हे सारे ठाऊक असल्याचे कदम म्हणाले .
श्रेय लाटण्यासाठी भाजपा नगरसेविकेने स्टंट केल्याचा नगरसेवक प्रकाश कदम यांचा आरोप
Date:

