नगरसेवक महेश वाबळे, स्वराज प्रतिष्ठान आणि तळजाई ट्रेकर्सच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हाथ

Date:

पुणे- रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली भागातील पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला ‘भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावून आले आहेत. शहरातील विविध भागातून पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. पद्मावती, सहकारनगर भागातून नगरसेवक महेश वाबळे स्वराज प्रतिष्ठान आणि तळजाई ट्रेकरसच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या आणि मदतीपासून वंचित असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मेठतळे, शिखली, कासरूड व हातलोट या गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मुठभर धान्याची मदत दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पूरग्रस्त भागातील मंडळींना जगण्याची नवी उमेद देते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उभा महाराष्ट्र धावून जातो हि महाराष्ट्राची संस्कृती आणि संतांची शिकवण आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी खचून न जाता खंबीरपणे संकटांना तोंड देण्यासाठी छोटीशी मदत मोठा आधार ठरते असे नगरसेवक वाबळे म्हणाले

यावेळी प्रशांत दिवेकर ,हरिष परदेशी ,भानुदास ढोबळे,संध्या नांदे,सारीका ठाकर ,बाबुराव शिगरे व तळजाई ट्रेकरचे सदस्य उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...