नगरसेवक महेश वाबळे यांच्या विकास निधीतून ऋतुरंग सोसायटी,वाळवेकर सोसायटी आणि आण्णा भाऊ साठे वसाहत या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण

Date:

  • माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग, योजने अंतर्गत प्रभागात सीसीटीव्हीची करडी नजर.

पुणे:- शहरामध्ये सोनसाखळ्या हिसकविण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सोसायट्यांच्या आवारातही सोनसाखळ्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. घरफोड्या किंवा सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना झालेल्या बहुतांश सोसायटीच्या आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे या घटनांतील आरोपी शोधण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत होती. चोरांन काढून सुद्धा जाणीवपूर्वक अशाच प्रकारच्या सोसायटया निवडल्या जात असल्याचे यावरून अधोरेखित होते, म्हणूनच माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग, या उपक्रमाअंतर्गत या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांनी व्यक्त केले. 

नगरसेवक महेश वाबळे यांच्या विकास निधीतून ऋतुरंग सोसायटी, संपूर्ण वाळवेकर परिसर आणि आण्णा भाऊ साठे वसाहत या ठिकाणी बसविण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण कार्यक्रमात गंभिरे बोलत होते.

साखळी चोऱ्या, घरफोड्या, वाहन चोरांवर अंकुश ठेवण्यासह परिसराची सुरक्षितता राखणे, चोरट्यांना व गुन्हेगारी कारवाई करणार्यांना पकडणे पोलिसांना सहज शक्य व्हावे या उद्देशाने माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग या उपक्रमाअंतर्गत प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा संकल्प नगरसेवक महेश वाबळे यांनी केला होता.

यावेळी बोलताना नगरसेवक महेश वाबळे म्हणाले सहकारनगर परिसरात बंगलो सोसायट्यांची संख्या जास्त आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि शांत आहे. अंतर्गत रस्तांवर रहदारी नसल्यामुळे निर्मनुष्य परिसराचा फायदा घेऊन सोनसाखळ्या हिसकविण्याचे प्रकार तसेच अनोळखी व्यक्तिंच्या घुसखोरी मुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींसाठी असुरक्षित वातावरण व रहिवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या घटना या सर्वांगिण बाबींचा विचार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शिळेश देशपांडे, सारिका ठाकर, हरिष परदेशी, मंगेश शहाणे, गणेश लगस, भानुदास ढोबले, मालती अवघडे, संगीता चौरे, मंजू डांगी, संध्या नांदे, प्रशांत थोपटे, अशोक ओंबसे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल:खासदार अनुराग सिंह ठाकूर

१५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप. पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती,...