पुणे : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने पद्मावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकूल येथे नगरसेवक महेश वाबळे यांच्या विशेष प्रयत्नातून नुकत्याच उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभासमोर भारतीय संविधानाचे वाचन करून सामूहिक शपथ घेण्यात आली. व उपस्थित नागरिकांना भारतीय संविधान प्रति भेट देण्यात आल्या.
नगरसेवक महेश वाबळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संविधान दिनाचे महत्त्व विशद करत भारतीय ह्या राज्यघटनेच्या शिकवणीची आठवण ठेवुन भारतीय संविधानाचे वाचन व सामुहिक शपथविधी घेण्यात आल्याचे सांगितले. तर आमदार माधुरी मिसाळ यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेत शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यांनी समाज घडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले असून स्त्रियांच्या न्याय हक्क साठी लढा दिला. त्यामुळे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, रघुनाथ गौडा,मनिषा वाबळे, गणेश लगत, कैलास मोरे, हरीश परदेशी, पुणे रेल्वे कमिटी सदस्य संगीता चौरे, विश्वास ननावरे इ. उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या काळात स्वच्छतेचे काम करणारे आरोग्य निरीक्षक नरेंद्र भालेराव यांचा भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष परदेशी यांनी केले, तर आभार संगिता चौरे यांनी व्यक्त केले.

