पुण्यात ‘क्वारंटाइन’साठी ‘म्हाडा’च्या इमारती

Date:

पुणे-परदेशातून, परराज्यांतून किंवा शहराबाहेरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सक्तीने १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’ करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाच्या चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे असलेल्या मोकळ्या इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी ‘म्हाडा’चे ३७६ मोकळे फ्लॅट असून, त्या ठिकाणी संबंधित नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास संबंधितांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये हलविण्यात येणार आहे.

‘होम क्वारंटाइन’ करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना सक्तीने १४ दिवस घरात बसण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र, तरीही अनेक नागरिक ‘होम क्वारंटाइन’च्या काळात बाहेर फिरत असल्याचे किंवा घरात बसून राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘म्हाडा’च्या रिकाम्या असलेल्या इमारती ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘म्हाडा’च्या पुणे विभागाने चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे इमारती बांधल्या आहेत. सध्या त्या इमारती रिकाम्या आहेत. त्या इमारतींमध्ये संबंधित नागरिकांची ‘होम क्वारंटाइन’ची व्यवस्था केली जाणार आहे. त्या इमारती जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून, त्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांमध्ये ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकांना उपचारासाठी नायडू हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, औंध किंवा भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. ‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांनी शहरात फिरू नये किंवा त्यांच्यामुळे कुटुंबीयांना लागण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. म्हाळुंगे येथील ‘म्हाडा’च्या इमारती या पुणे आणि पिंपरी शहरापासून दूर अंतरावर असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे असलेल्या मोकळ्या इमारतींमध्ये ‘होम क्वारंटाइन’ करण्यात येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था केली जाणार आहे. या इमारतींमध्ये ३७६ फ्लॅट आहेत. ‘होम क्वारंटाइन’ केलेल्या नागरिकांमध्ये ‘करोना’ची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. – अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...