लाखावर बाधितांची करोनावर मात

Date:

  • तब्बल एक लाख ११ हजार ८७८ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली

वॉशिंग्टन: करोनाचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावला असला तरी संसर्गबाधित रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. करोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत माहिती देणाऱ्या वर्ल्डोमीटर या संकेतस्थळानुसार, बुधवारी सायंकाळपर्यंत ४ लाख ३६ हजार ८१३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजार ६३७ जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ९२ हजार ४३ जणांवर उपचार सुरू असून १३ हजार २५५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र, त्याचवेळेस तब्बल एक लाख ११ हजार ८७८ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चीनमध्ये ७३ हजार ६५०, इटलीत ८ हजार ३२६, इराणमध्ये ९ हजार ६२५, स्पेनमध्ये ५ हजार ३६७, जर्मनीत ३ हजार ५३२, फ्रान्समध्ये ३ हजार २८१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. करोनावर अद्याप कोणतेही औषध नसून संशोधन सुरू आहे.चीनमधील हुबेई प्रातांची राजधानी वुहानमधून करोनाचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चीन व नंतर इतर देशातही करोनाचा संसर्ग फैलावला. चीनमध्ये करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असून वुहानमध्ये बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या करोनाच्या संसर्गाचे केंद्र युरोप असून युरोपीयन देशांना मोठा फटका बसत आहे. तर, अमेरिकेतही मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. योग्य काळजी घेणे, वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास करोनावर मात करणे शक्य असल्याचे तज्ञ सांगतात. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमारे ५० देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...