महाराष्ट्रातील कोरोनाबाधित माध्यमकर्मी सहका-यांच्या मदतीसाठी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर यांचे अर्ज पाठवण्याचे आवाहन
माहिती व प्रसारण मंत्रालय जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात पत्रकारांशी संबंधित सर्व कोविड प्रकरणांवर विचार करणार आहे. यामध्ये ज्या माध्यमकर्मीना कोरोना झाला आहे, त्यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे.
पत्रकार कल्याण योजना समितीच्या बैठकीत याविषयी माहिती दिली गेली आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्रालयाचे सचिव आहेत. सदर समितीची बैठक दि १८ डिसेंबर रोजी झाली. या बैठकीत सर्व सदस्यांनी कोविडग्रस्त पत्रकारांबद्दल चिंता व्यक्त केली. या प्रसंगी सचिवांनी सांगितले की, कोविडग्रस्त पत्रकारांसाठी विशेष बैठक बोलावली जाईल. आपल्या आजूबाजूस कोरोनामुळे जीव गमावलेल्या किंवा आर्थिक मदतीची गरज असलेल्याची (कोविड ट्रीटमेंटसाठी खर्च केलेले) माहिती देणे आवश्यक आहे. त्यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे.
तरी महाराष्ट्रातील एनयुजे इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव नलावडे, संजना गांधी, सुवर्णा दिवेकर हे एनयुजेइंडियाचे वरिष्ठ नेते शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पत्रकारांशी समन्वय साधण्याचे काम आहेत. ज्या पत्रकारांनी कोरोनामुळे जीव गमावलेल्या आहे अशांच्या कुंटुंबियांसाठी किंवा ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांना सरकार मदत करणार आहे. त्यांनी आपली माहिती (कोविड ट्रीटमेंटसाठी खर्च केलेले) देणे आवश्यक आहे. सहायतेसाठीचे आपले अर्ज दि ३१ डिसेंबर २०२० देण्यात यावेत. पुढील मेल आयडीवर prspib101@gmail.com व adgpf107@gmail.co आवश्यक कागदपत्रे अर्ज पाठवावे. तसेच याची एक प्रत एनयुजे महाराष्ट्रचे इमेल आयडीवर (maharashtranuj@gmail.com) आवश्यक कागदपत्रे अर्ज पाठवावे. जेणेकरून ते एकत्रितपणे पोहोचवणे व पुढील पाठपुरावा करणेस सोपे होईल असे आवाहन शीतल करदेकरअध्यक्ष नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र तथा सचिव एनयुजे इंडिया यांच्याकडून करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे
१)पत्रकार असल्याचा पुरावा
२)कोविडबाधित उपचाराचे कागदपत्रे
२) कोविड १९ने मृत्यू झाले असल्यास मृत्यूदाखला व मेडिकल रिपोर्ट
३) उत्पन्न दाखला/कुटुंबाचा
उत्पन्न पुरावा
संपर्क
एनयुजे, इंडिया,नवी दिल्ली
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
शिवाजीराव नलावडे
+91 98234 96259
संजना गांधी
+91 99238 82025
सुवर्णा दिवेकर
+91 98226 10366

