पुण्यातील या भागातील “कर्फ्यू’ 3 मे पर्यंत

Date:

पुणे – शहरातील काही भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहरातील आणखी काही भागांमध्ये नागरिकांना संचार मनाई (कर्फ्यू) केली आहे. याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला.

शहरातील काही विशिष्ट भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 6 एप्रिलपासून पुणे मध्यवर्ती पेठांचा भाग व पूर्व विभागात संचार मनाई आदेश दिला होता. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मंगळवारी शहरातील सर्व परिमंडळात येणाऱ्या काही विशिष्ट भागातही हा आदेश दिला असून, येत्या 3 मेपर्यंत हा आदेश लागू असल्याचे डॉ. शिसवे यांनी जाहीर केले.

व्याप्ती वाढविलेला संक्रमण परिसर पुढीलप्रमाणे

परिमंडळ 1 : खडक पोलिस ठाणे
– गंज पेठ परिसर : मासेआळी चौक, लहुजी वस्ताद तालीम चौक, पुणे मनपा कॉलनी नंबर 6, लोहियानगर पोलिस चौकी, ओझा रेशनिंग दुकान चौक, महात्मा फुले वाडा कमान, चॉंद तारा चौक.
– कासेवाडी भवानी पेठ परिसर : पिंपळेमळा भिमाले संकुल (सोनवणे हॉस्पिटलशेजारी), भगवा चौक, अशोक रिक्षा स्टॅंड, सुंदरम इडली लेन, धम्मपाल चौक, गोल्डन ज्युबिली चौक, आनंदनगर मित्र मंडळ चौक, 10 नंबर कॉलनी (मीरा दोडके स्टोअर्स शेजारी), 10 नंबर कॉलनी (सारनाथ बुद्धविहार).

परिमंडळ 2 : बंडगार्डन पोलिस ठाणे
– सिटी पॉइंट : उल्हासनगर, नदी किनारी झोपडपट्टी, ताडीवाला रोड परिसर उत्तरेकडील बाजू.
– जहॉंगीर चौक : लडकतवाडी, मेरू हॉटेल चौक, चव्हाण चाळ, लोकसेवा वसाहत परिसर, के टाइप रेल्वे बिल्डिंग, महात्मा फुले वसाहत, दुष्काळ झोपडपट्टी, वनआप्पा चौक झोपडपट्टी, बाल मित्र मंडळ झोपडपट्टी, विश्‍वजित तरुण मंडळ झोपडपट्टी परिसर, उल्हासनगर ते शूरवीर झोपडपट्टी परिसर, डिझेल कॉलनीसमोरील झोपडपट्टी, कपिला वसाहत झोपडपट्टी, सिद्धेश्वर मंडळ वसाहत.
– सौरभ हॉल : जगताप चाळ, दीपगृहासमोरील बाजू, राजगुरू चौक, रेल्वे कॉलनी (आर बी वन), भाजी मार्केट रोड, संगीता झोपडपट्टी, प्रगती मित्र मंडळ वसाहत, ललकार मित्र मंडळ, जनसेवा मित्र मंडळ झोपडपट्टी, भीमटोला मित्र मंडळ, भीम संघटना झोपडपट्टी, सारीपुत्र बुद्धविहार वसाहत, राजरत्न बुद्धविहार झोपडपट्टी परिसर.
– मध्य रेल्वे डीआरएम ऑफिसजवळ लुंबिनी नगर : पत्रा चाळ गल्ली नंबर 1 ते 48, प्रभाग क्रमांक 20 व व इनाम मशीद परिसर, इंदिरानगर झोपडपट्टी, इनाम नगर वसाहत, सर्व रेल्वे कॉलनी, पानमळा परिसर, कुमार पिनॅकल बिल्डिंग, सरस्वती सोसायटी, विनायक नगरी समोरील झोपडपट्टी, पाच बिल्डिंग परिसर, स्वीपर चाळ, शूरवीर चौक परिसर वसाहत, नाल्यावरची झोपडपट्टी
– नायडू हॉस्पिटलजवळील वसाहत – काची वस्ती झोपडपट्टी.

परिमंडळ 3 :
– सिंहगड रोड पोलिस ठाणे – राजीव गांधी नगर.
– दत्तवाडी पोलिस ठाणे – पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन परिसर.
– वारजे पोलिस ठाणे – रामनगर, गोकुळनगर पठार, तिरुपतीनगर.
– कोथरूड पोलिस ठाणे – केळेवाडी, सुतारदरा, जय भवानीनगर.

परिमंडळ 4 :
विश्रांतवाडी पोलिस ठाणे -, कळसगाव – कळसगाव मुख्य रस्ता, आर एन डी रस्ता, धापटे चौक, दर्गा शेजारील रस्ता
म्हस्के वस्ती – शारदा हॉटेल, ट्रीड म पार्क
चव्हाण चाळ, भीमनगर, वडार वस्ती, श्रमिकनगर, धानोरे गावठाण, मुंजाबा वस्ती, भैरवनगर.
खडके पोलिस ठाणे – सम्राट हॉटेल, भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, इराणी वस्ती, महात्मा गांधी पाटकर प्लॉट, नाबार्ड बॅंक, सीओईपी चौक, पाटील इस्टेट चौक, संगमवाडी पुलाकडे जाणारा पूल, पाटील इस्टेट गल्ली नंबर 1 ते 10, इमर्सन कंपनी, गोदरेज कंपनी, शॉपर्स स्टॉप, विल्यमनगर, अल्फा पेट्रोल पंप, पीएमसी कॉलनी वाकडेवाडी.
चंदननगर पोलिस ठाणे – प्रभाग क्रमांक पाच- आनंद पार्क, स्टेला मेरी स्कूल, सिद्धिविनायक मंदिर, टेम्पो चौक.
विमानतळ पोलिस ठाणे – गांधीनगर, जयप्रकाशनगर.

परिमंडळ पाच :
हडपसर पोलिस ठाणे, म्हाडा कॉलनी परिसर, रेल्वे लाईनजवळील वसाहत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...