पुणे- पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकांमुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतानाच माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपावर टीकास्त्र डागतच त्यांनी आज शहर अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि आगामी निवडणुकीत पुणेकरांना फसविणाऱ्या भाजपाला ९८ जागांवरून २० जागांवर खेचण्याची आपली रणनीती राहील हे जाहीर केले . पहा आणि ऐका नेमके राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष prashant जगताप यांनी काय म्हटले आहे. ….