काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरती वरील स्थगितीवर बोलताना मोदी सरकारला सरकारी कार्यालये कायम वेतनावरील कर्मचारी मुक्त करायचे असल्याचा आरोप केला. कोरोना तर निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालये कायम वेतनावरील कर्मचारी मुक्त करायची असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
याबाबत राहुल गांधी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोरोना मात्र निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालयांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपासून मुक्त करायचे आहे. त्यांना युवकांचे भविष्य खराब करुन आपल्या मित्रांनाच पुढे न्यायचे आहे.”दरम्यान मोदी सरकारने नोकर भरतीच्या परीक्षांचे निकाल आणि तरुणांच्या प्रश्नांवरील उपाय द्यावेत, अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका करत एक व्हिडीओ मालिकाच सुरु केली. यात त्यांनी नोट बंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांवर निशाणा साधला आहे.

