ओतूर -(संजोक काळदंते)
येथील १० वी परीक्षा केंद्रावर गुरुवारी(दि.१६) १४ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. इतिहास विषयाचा पेपर होता.या केंद्रावर कॉपी चालत असल्याची माहिती मिळाल्यावर अचानक जुन्नरचे शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली.त्यावेळी एकूण १४ विद्यार्थी कॉपी सह आढळून आले. सर्व विद्यार्थ्यांची कॉपी प्रकरणे बोर्डाकडे पाठविणेबाबत केंद्रसंचालक श्रीमती बोऱ्हाडे एम. आर. यांना सूचना दिल्या असल्याचे जुन्नरचे शिक्षण विस्तार अधिकारी के.डी.भुजबळ यांनी सांगितले.
यातील बहुतांशी विद्यार्थी १७ नंबर फॉर्म भरुन परिक्षेस बसले असल्याची माहीती मिळाली आहे *
शिक्षकाच्या खिश्यात कॉप्या….त्यावर उसळली चर्चा
परिक्षाकेंद्रावर अचानक केलेल्या तपासणीत या केंद्रावरील ब्लॉक क्र.१६ वरील पर्यवेक्षकाच्या खिश्यात कॉप्याची १४० पाने मिळून आली. खिशात वरून रुमाल आणि त्याखाली खिशात कॉपी मिळून आली. शिक्षकाने मुलांना जर सहाय्य केले असेल तर गंभीर बाब आहे.याची गंभीरपणे दखल घेऊन कारवाईसाठी अहवाल शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि बोर्डाकडे सादर केला जाणार आहे असेही शिक्षण विस्तार अधिकारी भुजबळ यांनी सांगितले. तर सदर शिक्षकाने परिक्षा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांकडुन या (कॉप्या) कागद काढून घेतले होते तेच कागद शिक्षण विस्तार अधिकारी यांना मिळाले असून कोणत्याही विद्यार्यांला सहकार्य करण्याचा अनुचित हेतू नसल्याचे शिक्षकाकडून मांडले जात आहे
यातील बरेच विद्यार्थी १७ नंबर फॉर्म भरुन परिक्षेस बसले असल्याचे बोलले जाते.