पुणे :- गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधान दिन साजरा केला.
यावेळी स्कूलच्या गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी याप्रसंगी उपस्थित होते.यानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून(Presentation) तसेच नाटकांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्ये आणि त्यानंतर संविधानाच्या समाविष्ट केलेल्या मूल्यांची माहिती दिली.सोनू गुप्ता यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या,संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना अवलंबण्यासाठी जागरूक केले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने येणाऱ्या पिढीला ही तत्त्वे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
आपले हक्क आणि जबाबदारी विद्यार्थ्यांना समजावी, या हेतूने गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.असे विचार मुख्यध्यापिका भारती भागवाणी यांनी मांडले.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिन साजरा
Date:

