मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर :- क्रेडाई नॅशनल तर्फे येत्या ९ व १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथे न्यू इंडिया समिटचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील जास्तीत जास्त शहरांमधील रिअल इस्टेट विकासकांची प्रगती आणि आव्हाने याबाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असणार आहेत. यात देशातील १७२ शहरातील ८०० पेक्षा अधिक विकसक यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.
पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियानात’ योगदान देण्यात क्रेडाई सदस्यांचा सहभाग वाढावा यासाठी क्रेडाई क्लीन सिटी मूव्हमेंट तर्फे ‘कचरा व्यवस्थापन’ संदर्भातील सामंजस्य करार क्रेडाई तर्फे केला जाणार आहे. यामुळे क्रेडाईशी संघटीत प्रत्येक विकसकाला स्वत:च्या प्रकल्पांमध्ये कचरा व्यवस्थापनाची ही प्रणाली बसवणे आवश्यक असणार आहे. प्रशासनावर कचरा व्यवस्थापनाचा अधिक बोजा येऊ नये यासाठी या प्रणालीचा उपयोग केला होईल.
‘छोटी शहरे मोठ्या क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात छोट्या शहरांमधील विकासकांचे योगदान वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्या क्षमतांचा उपयोग करून घेणे हे क्रेडाईचे उद्दिष्ट आहे.
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले कि, “नव्या सरकारी धोरणांना क्रेडायने नेहमीच पाठींबा दिला आहे. या क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून ‘२०२२ सालापर्यंत सर्वांसाठी घरे’ या मिशनसाठी योगदान देण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. यासाठी आमच्या सदस्यांना टिअर II, III वIV शहरांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. या विकासकांना ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्याबाबत चर्चा करणे हा या न्यू इंडिया समिटचा हेतू आहे.

