राहुल देशपांडे यांच्या गायकीचा घेतला आस्वाद
पुणे – भय इथले संपत नाही,बगळ्यांची माळ फुले यासारख्या सुरेल संगीत रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अशा चैतन्यमय वातावरणात पुणेकरांची रविवारची संध्याकाळ
रंगली. निमित्त होते सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लि आयोजित‘राहुल देशपांडे लाईव्ह’ या कार्यक्रमाचे.
महालक्ष्मी लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, निरामय वेलनेस सेंटरच्या अमृता चांदोरकर, व्हीजीए डिजीटल प्रिंटर्सचे व्यंकटेश मांडके,सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लिचे सचिन पाटील आणि अजय मोरे यावेळी उपस्थित होते.
राहुल यांनी सादर केलेली ‘सहेला रे …’ ही चीज तर खास गानसरस्वती किशोरी
आमोणकरांची आठवण ताजी करणारी होती. हर्ष, क्रोध, लोभ,मोह,मत्सर या भावनांच्या यांच्या परे घेवून जाणारे शास्त्रीय संगीत असते. अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘सुर निरागस हो’ या गाण्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेत वन्स मोर मिळवला. ‘घेई छंद मकरंद’ सादर करताच रसिकांनी उस्फूर्त दाद देत या स्वरमैफिलीत खऱ्या अर्थाने रंग भरले.
यावेळी निखिल फाटक यांनी तबल्यावर सुरेख ठेका धरत रसिकांची वाहवा मिळवली.
निखिल फाटक (तबला),भूषण माटे (गिटार), आदित्य जोग (सहयोगी संगीतकार),अभिजित भदे (रिदमिस्ट), अनय गाडगीळ (कीबोर्ड) यांनी सुरेख साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे रंगतदार आणि माहितीपूर्ण निवेदन केले.