‘सुखकर्ता २०१७’ च्या मैफीलीमध्ये रसिक मंत्रमुग्ध

Date:

गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजनरसिकांचा भरभरून प्रतिसाद

 

पुणे :- अगो बाई ढगो बाई…च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल…इवली इवली पाठ आणि लट लटणारे पाय … या गाण्यांवर झालेला

भावनांचा कल्लोळ एका माकडाने काढले दुकान… या गाण्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी

वातावरणात पुणेकरांची रविवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजित आर्या आंबेकर व संगीतकार डॉ. सलिल

कुलकर्णी यांच्या ‘सुखकर्ता २०१७’च्या कार्यक्रमाचे. सिंहगड जवळील गंगा भाग्योदय टॉवर्स येथे काल हा कार्यक्रम पार पडला.दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्त्याने गोयल गंगा परिवाराचे सर्व सदस्य एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतात.

 

यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल, सीईओ किरण कुमार देवी  उपस्थित होते.तीन तासांहून अधिक वेळ रसिक या सांगीतिक आविष्कारात हरवून गेले होते.

नाचे माझा सखा पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या भक्तिगीतांनी मैफिल रंगून गेली होती.ऐरणीच्या देवा तुला, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय… या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

तर आर्या आंबेकरच्या अस्सल रागदारीतील आयटम साँग  ‘अर्ध्या रात्री सोडून जायचं नाय’ या गाण्याने प्रेक्षकांना

थिरकावयाला लावले.

आदित्य ठाकरे (तबला) ,राजेंद्र दूरकर (ढोलकी), दर्शना जोग(किबोर्ड) यांनी सुरेख साथ दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...