मुंबई : महाराष्ट्राचे आद्य क्रांती कारक उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी या मागणीसाठी रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह गृह राज्य मंत्री राम शिंदे यांनी रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्याची ग्वाही दिली. तसेच उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे ही मान्य केले.
इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरी केली जाते. उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी व्हावी अशी रामोशी समाजाची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती. मात्र गेली अनेक वर्ष प्रयत्न करूनही सरकारी पातळीवर उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली जात नव्हती. याबाबत आज . याबाबत मुंबईतील आझाद मैदानात रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाची मंत्री गिरीश बापट यांनी मा. मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली. या चर्चेत येत्या सात सप्टेबर रोजी साजरी होणारी क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती सरकारी इतमामाने आणि सरकारी खर्चाने साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्याच प्रमाणे पुरंदर येथे असलेल्या उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी सरकारच्या वतीने निधी मिळावा अशी ही मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत १ कोटी रुपयांचा जाहीर केला. तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे श्री बापट यांनी मान्य केले.
रामोशी समाज सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा अशी ही शिष्टमंडळाची मागणी होती. या बाबत ही शासनाकडून सकारात्मक प्रयत्न करण्याचे मान्य करण्यात आले.


