पुणे :- रेरा कायद्यांतर्गत प्रकल्पाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील प्रक्रियेसाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑगस्ट ला क्रेडाईच्या सर्व ४४ शहर संस्थांमध्ये क्रेडाईच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन केद्रांची सुरुवात करणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.
प्रत्येक जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांकांची नोंद करणे,दर ३ महिन्यांनी प्रकल्पांविषयीची प्रगती अहवाल वेबपेज वर टाकत राहणे, कायदेशीर काळजी कशी घ्यावी,आदी गोष्टींचे मार्गदर्शन या केंद्रावर दिले जाणार आहे.
“कायदा चांगला असून त्याचे स्वागतही आम्ही केले आहे.पण प्रत्येक विकसकाला रेराच्या लहानात लहान पैलूची माहिती असणे आवश्यक आहे यामुळेच भविष्यात होणाऱ्या चुका कमी होण्यासाठीच क्रेडाई महाराष्ट्र रेरा अभ्यास समिती मार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे निश्चितच क्रेडाईच्या सर्व सदस्यांना या कायद्यांशी अधिक सुसंगतपणा साधता येईल आणि त्यांचे व्यवसाय सहजतेने चालवण्यासाठी मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त प्रकल्प रेरा अंतर्गत येऊ शकणार असल्याने याचा फायदा पर्यायाने ग्राहकांनाच होईल.” असेही ते म्हणाले.
– क्रेडाई महाराष्ट्रही संघटना ही राज्यातील ७५टक्क्यांपेक्षा जास्त महत्वाच्या विकासकांच्या संघटीत बांधकाम क्षेत्रासाठी (मुंबई वगळता) ओळखली जाते. यात ४४ शहर संघटनांमधील २६०० विकासकांचा समावेश आहे.