पुणे : लोकप्रतिनिधी हा सरकार आणि जनतेमधील दुवा असला पाहिजे. कार्यकर्ता आणि पोलिसांनी समाज परिवर्तनासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तरच पोलीस यंत्रणा अधिकाधिक समाजाभिमुख बनेल.अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
कसबा मतदारसंघाच्या विकास निधीतून पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांना या निधीतून संगणकांचे आणि प्रिंटर्सचे वाटप फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, युवासेना अध्यक्ष दीपक पोटे तसेच दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मा. रवींद्र सेनगावकर, मा. बसवराज तेली पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १), मा. सुधीर हिरेमठ (पोलीस उपआयुक्त आर्थिक व सायबर क्राईम), मा. बाजीराव मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त ,मा. शरद उगले सहाय्यक पोलीस आयुक्त(विश्रामबाग), मा. बी. जी. अंबुरे पोलीस निरीक्षक (फरासखाना), मा. बाळासाहेब सुर्वे पोलीस निरीक्षक (विश्रामबाग) तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले कि, पोलीस यंत्रणेला अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करता यावे त्याचबरोबर त्यांच्या कामाची गती वाढावी, वेळ कमी व्हावा आणि जनतेच्या समस्या अजून सक्षमपणे हाताळल्या जाव्यात यासाठी कसबा मतदारसंघाच्या विकास निधीचा सदुपयोग व्हावा म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सेनगावकर म्हणाले कि, आजच्या बदलत्या युगात तपासासाठी जास्तीत जास्त यंत्रणेची आवश्यकता असते त्यासाठी केलीली ही मदत आम्हाला खूप उपयोगी पडेल. काही दिवसांवर गणपती आले असताना गणेश मंडळांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी,त्याची नियमावली, त्याचे अॅप विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे ते यावेळी म्हणाले. याशिवाय स्पीकर आणि डॉल्बी यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून काही सामाजिक उपक्रम राबवता यावा यासाठी आपले सहकार्य मिळावे अशी भावना त्यांनी यावेळी मांडली.
सायबर सेल, फरासखाना पोलीस स्टेशन,विश्रामबाग पोलीस स्टेशनला, खडक पोलीस ठाणे(शुक्रवार पेठ), खंडणी विरोधी पथक,रविवारपेठ पोलीस ठाणे , जिल्हाधिकारी कार्यालय(पुणे शाखा) यांना संगणकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कोंडरे तर आभारप्रदर्शन छगन बुलाखे यांनी केले.