भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या प्रयत्नाला यश
पुणे ता.३ : गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएमपीएमएलची खंडीत असलेली बससेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने व पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते डेक्कन जिमखाना या बसला हिरवा झेंडा दाखवून ही बस मार्गस्थ केली.
यावेळी भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड, शिवाजीनगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, पीएमपीएमएलचे डेपो मॅनेजर नारायण कर्डे, समीर अत्तार प्लानिंग ऑफिसर चंद्रकांत वरपे, संजय शिवले, चालक ज्ञानेश्वर बाविस्कर, वाहक बाळासाहेब तिकोने, दैनिक सकाळचे बाबा तारे,बातमी डॉट इनचे राजेश माने, सोनाली निकाळजे, वर्षा शिंदे, नंदा खंडागळे, मीरा काकडे, सोनाली तुंडलायत, आशा लोट, स्वीटी दुसाने, लीना पगारे, कल्पना देवरे, मीरा काकडे, बाबुराव बावधाने, सुरेश काशीद,नंदू वाडिया, ऋषिकेश करोते, संदीप बोत्रे, महेंद्र उर्फ बंडू कदम, बुद्धभूषण मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत भालेराव, अरुण बागडी, संदीप चौरे, नितीन गायकवाड (एच.एम.), संतोष भिसे, रोहित लोखंडे, हिमांशू मुथय्या, ऋषभ काळे, सिद्धांत जगताप, सुनील कांबळे,राहुल कांबळे,संकेत कांबळे, अनिल माने, प्रतिक वाघमारे, आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएमपीएमएलची बससेवा गेल्या दोनवर्षांपासून खंडीत करण्यात आली होती. विद्यापीठातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अथवा स्थानिक महिलांना शहरात जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. पुणे शहराचा महत्वाचा भाग असूनही येथे वाहतुकीची समस्या असल्याने याबाबत मी पीएमपीएमएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा व पीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांना पत्र देऊन ही बस सेवा तातडीने सुरु करण्याविषयी विनंती केली होती. यानुसार आज पासून बससेवा सुरु करण्यात आली.
प्रकाश ढोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी कामे आम्ही सातत्याने करत असतो. या पूर्वी औंध रोड, बोपोडी भागात अनेक विकास कामे केली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बस सेवा पूर्ववत सुरु करणे ही सुरुवात असून येणाऱ्या काळात अनेक विकास कामे आम्हाला या भागात करायची आहेत. ही बससेवा पूर्ववत सुरु झाल्याने येथील महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय कमी होईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनेक समस्या आहेत मात्र ते जाणून घेण्यासाठी आजवर आमच्या पर्यंत कोणी आले नव्हते. पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक प्रकाश ढोरे व सुनील माने यांनी पुढाकार घेतला आहे. असे मत या भागातील महिलांनी व्यक्त केले.

