वचनपूर्तीकडे वाटचाल : गिरीश बापट
पुणे-
” आर्थिक उन्नतीकडे झेपावणारा प्रगतशील अर्थसंकल्प. अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी आज केन्द्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की सर्वसमावेशक. मध्यमवर्गीयांसह शेतकरी. कामगार.महिला.दिव्यांग व्यक्ती .ज्येष्ठ नागरिक. अशा सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात अर्थमंत्री निर्मला सितारामन यशस्वी ठरल्या आहेत. मी त्यांच्या सर्व घोषणांचे स्वागत करतो. शेती, शिक्षण,आरोग्य, विज्ञान या क्षेत्राला गती देणारे निर्णय घेतल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन. खास सोळा कलमी योजना जाहीर केल्याने शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारेल याची मला खात्री वाटते. शिक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला संधी दिल्याने देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल. या क्षेत्रातील मक्तेदारीला आळा बसेल. शिक्षणाची गुणवत्ता.दर्जा सुधारेल. त्यादृष्टीने उचललेले हे महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. सौरऊर्जा. इंटरनेट. नवीन विमानतळाची निर्मिती.यावर भर दिल्याने देशाची निश्चित आर्थिक भरभराट होईल. पाच लाखापर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे कवच मिळाल्याने पतपेढ्या व सहकारी बॅकातील गुंतवणुकीला चालना मिळेल. या अर्थसंकल्पाचे मी समर्थन करतो.