क्रेडाई-पुणे मेट्रोच्या नव्या व्यवस्थापन समितीने सूत्रे स्वीकारली
पुणे: सरकार विविध प्रक्रियांचे विकेंद्रीकरण करून अधिकार सोपविण्याचा प्रयत्न करत आहे. विकसक याप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात आणि विकसकांनी केलेल्या कोणत्याही सूचनांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादननागरी विकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केले.
गुरुवारी पुण्यात झालेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या विशेष साधारण सभेत डॉ. करीर बोलत होते. क्रेडाई-नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई-नॅशनल रेरा समितीचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाईचे अनेक माजी अध्यक्ष आणि क्रेडाईचे समितीसदस्य या प्रसंगी
उपस्थित होते. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या मावळत्या आणि नवीन अध्यक्षांचा
सत्कार करण्यातआला तसेच परांजपे यांनी आपल्या समितीतील सहकाऱ्यांची
ओळख संघटनेच्या सदस्यांना करून दिली.
परांजपे यांच्यासह सुहास मर्चंट, रोहित गेरा, मनिष जैन आणि अमर मांजरेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली तर रंजीत नाईकनवरे आणि अनुज भंडारी यांची मानद सचिव म्हणून निवड करण्यात आली. मुख्य अतिथी म्हणून बोलताना डॉ. करीर म्हणाले, “प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार उत्सुकआहे. सरकार अधिकारांचे विकेंद्रीकरण करून विविध स्तरांवर जबाबदारी सोपवत आहे. उदा. उदाहरणार्थ, सरकारने पर्यावरणमंजूरी आणि इमारत परवानग्यांची प्रक्रिया सुलभ
केली आहे. आता महापालिकांकडे अधिक अधिकार आहेत. त्याचप्रकारे बांधकाम आणि
अन्य व्यावसायिकही या प्रक्रियेचा भाग होऊ शकतात.”विशेषत: विकास योजनांना मंजुरी देण्याच्या धीम्या गतीवर भर देत ते म्हणाले, की शहरीकरणाच्या प्रमाणात विकास योजना गतिशील नाहीत त्यामुळे या संदर्भात आलेल्या कोणत्याही सूचनेचे स्वागतच असेल.
“आपणा सर्वांना स्वतःची प्रतिमा सुधारणे आवश्यक आहे. सरकारचा एक भाग म्हणून आम्ही तो प्रयत्न करीत आहोत.हे केले नाही तर लंबक दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो आणि त्यामुळे आपले भविष्य धोक्यात येऊ शकते. तरुणपिढी भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनण्यास तयार नाही. एखादा सामाजिक कार्यकर्ते किंवा संघटना भ्रष्टाचार निपटून काढतअसेल, तर त्याचे किंवा तिचे स्वागत आहे. हा मूलभूत बदल
घडवून आणण्यासाठी आपण धैर्य दाखवणे आवश्यक आहे. हळूहळू केलेला बदल आपल्या व्यवस्थेत कामी येणार नाही आणिआपल्याला काही तरी मूलभूत वेगळे केले पाहिजे,” असे ते म्हणाले. यावेळी क्रेडाई-नॅशनलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सतीश मगर यांचा तर क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शांतीलाल कटारिया यांचा सत्कार करण्यात आला.
परांजपे म्हणाले,”बांधकाम उद्योग हा सातत्याने बदलत असलेला व्यवसाय आहे. प्रत्येक गोष्ट बदलत असते आणिआम्हाला आव्हान देते. तरीही, आपल्याला आपले ध्येय साध्य करावे लागतील. आपण आपली प्रतिमा सुधारली तर तरआपण लढाई जिंकू शकतो. ग्राहक आणि ग्राहक संघटनांशी आपण संवाद सुरू करण्याची त्यांच्या सूचनांचासकारात्मक विचार करण्याची गरज आहे. ”
“विश्वासार्ह, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि राष्ट्र उभारणीसाठी अवश्यक योगदान देणारा घटक म्हणूनविकसक समुदायाचे चित्र” उभे करावे लागेल, असा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
तत्पूर्वी, आपल्या प्रारंभिक भाषणात श्री. रोहित गेरा यांनी व्यवसाय करण्यातील सुलभतेवर विचार मांडले. ते म्हणाले, “सरकार आपल्यासाठी खूप काही करत आहे आणि व्यवसाय करणे सोपे बनवत आहे.
जागतिक बँकेने केलेल्याव्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताची एकूण स्थिती सुधारली आहे, परंतु आज बांधकाम परवाना मिळविण्यासाठी सर्वात अवघड देशांमध्ये भारताचे नाव गणले जाते. त्यामुळे सरकारला काय हवे आहे आणि प्रत्यक्षात काय घडत आहे, यात बरेच अंतर आहे.”
मर्चंट यांनी रियल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट (रेरा ) एक सादरीकरण केले.