खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली मदतीचा ओघ सुरु

Date:

पुणे ता. १०:- महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.तेथील जनतेला मदत देण्याचे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी काल केले होते. त्यानुसार आजपासून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आजच्या पहिल्या टप्यात सुमारे 30 ते 35 टेम्पो भरून मदत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे जमा करण्यात आली.

 गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. महापुरात अडकलेल्या लोकांची सर्वबाजूनी कोंडी होत आहे. त्यांचा संसार वाहून गेला आहे. सध्या त्यांना पिण्यासाठी पाणी नाही, पोटभरण्यासाठी खायला ही त्यांच्याकडे काही नाही. सरकारने पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. देशभरातून मदत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा होत आहे. अशावेळी या लोकांना मदत करणे आपले ही कर्तव्य आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करावी असे आवाहन खासदार बापट यांनी केले होते. खासदार गिरीश बापट व लेफ्टनंट जनरल डॉ.डी.बी शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या कॅटलिस्ट फाउंडेशन आणि नगरसेवकांमार्फत ही मदत संकलीत करण्याचे संयोजन केलं जात आहे. काल विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार लोकांना पिण्याच्या पाण्याची व बिस्किटे, चिवडा, लाडू, यासारखे कोरडे पदार्थ, औषधे यांची जास्त आवश्यता होती त्यानुसार आज मदत देण्यात आली. या भागातील पाऊस कमी झाला काही प्रमाणात पुराचे पाणी कमी झाले आहे.तरीही लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लोकांना कपडे, ब्लँकेट, सतरंजी, भांडी यांची आवश्यकता आहे. याप्रमाणे कार्यकर्त्यानी जमा करण्याचे आवाहन खासदार बापट यांनी आज केले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,  कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, नगरसेवक राजेश येनपुरे,उमेश गायकवाड, सुशील मेंगडे,दीपक पोटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, आरती कोंढरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, मनिषा लडकत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पूरग्रस्त भागातील लोकांसाठी सर्वबाजूनी मदत येत असताना पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक ही यात मागे नाहीत. आज महापौर मुक्ता टिळक यांनी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांसाठी देत असल्याची घोषणा केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...