Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बांधकाम व्यवसायाला उज्ज्वल भविष्य – क्रेडाईच्या दोन दिवसीय परिषदेची सांगता

Date:

पुणे –  बांधकाम क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून शासन स्तरावरदेखील नियम व प्रक्रियेमध्ये अनेक बदल होत आहेत. सद्यस्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरु असून त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यवसायिक बांधकाम आहे भारतातील ९२ टक्के जनता हि मेट्रो शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात राहत असून या शहरांमध्ये फक्त ४० टक्के बांधकाम झाले असल्याने सर्व बांधकाम व्यावसायिकांना मोठी संधी आहे क्रेडाईच्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन अडचणींमधून मार्ग काढण्याची विनंती सरकारला केल्यास बांधकाम व्यवसायाला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत मान्यवरांनी समारोपाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्त केले.

क्रेडाई महाराष्ट्र तर्फे नाशिकमध्ये आयोजित ‘महाकॉन २०१८’ या  वार्षिक परिषदेची सांगता झाली. यात ५१ शहरातून १००० हून अधिक विकसक उपस्थित होते.माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष  कटारिया यांनी दिली

महाकॉन मधील प्रत्येक सत्र हे विकसकांसाठी उपयुक्त ज्ञान मिळवण्याची पर्वणीच ठरला असल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.

या परिषदेत मुंबईतील लोढा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर,  अध्यक्ष जक्षय शहा,  उपाध्यक्ष  बोमन इराणी,  माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस.चोकलिंगम , ऍनॉरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट अध्यक्ष अनुज पुरी, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, महाकॉनचे समन्वयक गिरीश रायबागे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल  हे उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रात ब्रँड चे महत्व सांगताना गीतांबर आनंद, इरफान रझाक,सुहास मर्चंट,सतीश मगर उपस्थित विकसकांना मार्गदर्शन केले. दर्जा आणि विश्वास या सोबतच योग्य संवाद हे ब्रँड बनवण्याचे गमक असल्याचे नमूद केले. याशिवाय क्रेडाई नैशनलचे जक्षय शहा क्रेडाई मुळेच व्यवसाय बहरला हे देखील आवर्जून सांगितले

आम्ही लैंड टायटल इंशुरन्सच्या विरोधात नाही पण त्याची प्रिमियमची किंमत अतिशय अवास्तव  असल्यामुळे ती कमी करणे गरजेचे आहे शिवाय त्यात स्पष्टता आणणे आवश्यक आहे .याशिवाय क्रेडाई या मुद्द्यांविषयी विमा नियामक केंद्र आणि राज्य सरकारकडे जाणार असल्याचे मत कटारिया यांनी मांडले.

यावेळी क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद यांनी लिहिलेल्या ‘परवडणारी घरे’ या विषयावरील बुलेटीनचे  प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...