Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शनिपार चौकात प्रदुषण नियंत्रक यंत्रणा , महापौरांच्या हस्ते उदघाटन

Date:

पुणे : वाढत्या वाहनसंख्येमुळे शहराची प्रदुषण पातळी दिवसेंदिवस वाढत चालली असून ही स्थिती चिंताजनक आहे. केवळ पुणे शहरच नव्हे, तर देशातील अनेक शहरांना वायू प्रदुषणाचा विळखा बसला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी अमोल चाफेकर यांनी हवा प्रदुषण नियंत्रक विकसित केले असून हे नियंत्रक आज शनिपार चौकाजवळील जनता सहकारी बँकेच्या परिसरात बसविण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या यंत्रणेचे उदघाटन करण्यात आले.

या नियंत्रकामध्ये अशुध्द हवा शोषून त्या हवेचे शुध्दीकरण केले जाते आणि शुध्द हवा परत बाहेर सोडली जाते. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा वरदान ठरणार असून प्रदूषणमुक्त पुण्यासाठी उचलेले हे  ‘स्मार्ट’ पाऊलच म्हणावे लागेल.

याविषयी माहिती देताना चाफेकर म्हणाले की, हे नियंत्रक प्रामुख्याने रहदारीच्या ठिकाणी बसविण्यात येते. प्रदूषण नियंत्रण आटोक्यात आणण्याबरोबरच परिसरात शुध्द हवा उपलब्ध करुन देणे अशा  दुहेरी पातळीवर ही यंत्रणा काम करते. यामध्ये ०.५ एचपी क्षमतेच्या मोटारद्वारे वातावरणातील २००० सीएफएम (क्युबीक फीट पर मिनिट)  इतकी हवा शोषली जाते. मानवी आरोग्यास हानिकारक असलेले २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण या उपकारणातील फिल्टरद्वारे शोषले जातात व शुद्ध हवा बाहेर सोडली जाते. याची संपूर्ण देखभाल आमच्या गँब्रीलकंपनीमार्फत कोणतेही शुल्क न आकारता केली जाते, असेही चाफेकर यांनी सांगितले.

दिवसेंदिवस होणारी प्रदुषणातील वाढ या स्थितीचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषण नियंत्रणासाठी प्रदुषण नियंत्रक बसविणे ही येत्या काळाची गरज आहे.  प्रदुषणाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी या नियंत्रकाचा जनतेला फायदा होईल. दुचाकी व सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करणाऱ्या लोकांना रोज प्रदुषणाला सामोरे जावे लागत असल्याने हे नियंत्रक जास्त रहदारीच्या ठिकाणी बसवल्यास जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा  होईल. असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

पुण्यात २ हजार प्रदूषण नियंत्रके  

हवा प्रदुषण नियंत्रण करणारी पुण्यातील पहिली यंत्रणा नळ स्टॉप येथे कार्यरत असून येत्या काळात पुण्यात २ हजार नियंत्रके बसविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, आयटी पार्क, बँक, रुग्णालयांच्या परिसरात हे उपकरण बसविण्यात येणार आहे. याआधी ठाण्यात महापालिकेच्या सहकार्याने २०० यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या असून संपूर्ण देशात १ लाख प्रदूषण नियंत्रक बसविण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे चाफेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...