पुणे :- बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यादृष्टीने पुणे महानगपालिका आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने गोयल गंगा टॉवर्स मार्केटयार्ड या प्रकल्याच्या साईट वरील कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरात १५० हुन अधिक बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्शन आणि रक्तदाब तपासणी आणि इतर अजून तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय पावसाळ्यात बळावणाऱ्या रोगांची संख्या लक्षात घेवून डेंगू, मलेरिया सारख्या इतर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याविषयी देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. गोयल गंगा डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, संचालक अमित गोयल, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ आणि क्रेडाई पुणे मेट्रो महिला शाखेच्या निमंत्रक अर्चना बडेरा, कामगार कल्याण समितीचे सदस्य पराग पाटील, मुकेश गाडा, समीर पारखी, गोयल गंगा डेव्हलपर्सच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख उदय पाटील, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, महापालिकेचे समन्वयक अधिकारी विनोद जाधव व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या सहसचिव डॉ. केतकी घाटगे यावेळी उपस्थित होते.
यावेळी अतुल गोयल म्हणाले कि, आजच्या धकाधकीच्या युगात वाढते औद्योगिकरण व त्यांच्याशी संबंधित शारीरिक व्याधी वाढत आहेत त्यामुळेच वेळीच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
‘देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे.त्यासाठी त्याचे आरोग्य कसे सुदृढ राहील याची काळजी घेणे हि आमची जबाबदारी आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचविण्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील अमित गोयल यांनी दिले.

