पुणे :- ग्लोबल इनोव्हेटिव्ह स्कूल अवॉर्ड २०१८ या पुरस्काराने गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामाजिक जागरुकता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सांस्कृतिक कलाकृतींमधील समावेश या सर्व मापदंडांच्या आधारावर गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलला बिट्स पिलानी दुबई कॅम्पसमध्ये येथे हा पुरस्कार देण्यात आला.
गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती भागवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.शिवाय गोयल गंगा फाऊंडेशनच्या विश्वस्त सोनू गुप्ता सोनरी महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार २०१८ हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सोनू गुप्ता म्हणाल्या की, गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलने नेहमीच समाजाला काहीतरी सकारात्मक देण्यासाठी प्रयत्नशील असते तसेच शाळेतुन बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या जगातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही कार्यक्षम बनवत असतो. शिवाय सातत्यपूर्ण प्रयत्नातून देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असतो.