विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री व आमचे नेते अरूण जेटली यांचे अभिनंदन. शेतकरी .महिला. विद्यार्थी. कृषी उद्योजक. कामगार. ज्येष्ठ नागरिक .बेरोजगार अशा समाजाच्या सर्व थरातील लोकांना लाभ मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व घटकांना अर्थमंत्र्यांनी न्याय दिला आहे. ” सब का साथ सबका विकास ” या भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्याचे प्रतिबिंब यांत दिसते आहे. त्यामुळे देशाला अच्छे दिन आले आहेत. असे म्हणता येईल. या सरकारमुळे भ्रष्टाचार व काळा पैसा या विरोधातील लढ्याला यश आले असून अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे फार मोठे काम अरूण जेटली यांनी केले आहे. बचत गटांना वाढीव कर्ज, एक्कावन्न लाख घरांची निर्मिती, शेती कर्जासाठी अकरा लाख कोटी रुपये,आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल, आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना, गतीमान पासपोर्ट सेवा,फूडपार्क,मस्त्योद्योग व पशूपलनाला चालना नउ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग इत्यादी तरतुदी पाहाता देशाला प्रगती पथावर नेणारा अर्थसंकल्प असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
गिरीश बापट
पालकमंत्री पुणे