भारतीय पोलादाचा वापर आर्थिक वर्ष 22 मध्ये 11.5% ने वाढून 106 दशलक्ष टन झाला

Date:

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2022


पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी आज नवी दिल्लीत एका परिषदेत सांगितले की, देशाने एक लाख कोटी रुपयांचे 13.5 दशलक्ष टन तयार पोलाद निर्यात केले आणि सुमारे 46,000 कोटी रुपयांचे पोलाद आयात केले. पोलाद क्षेत्राच्या प्रभावी कामगिरीने भारतातून 420 अब्ज अमेरिकी डॉलर किमतीच्या व्यापारी मालाच्या निर्यातीच्या आत्तापर्यंतच्या विक्रमात योगदान दिले. मेटॅलॉजिक पीएमएसद्वारे आयोजित पोलाद आणि अभियांत्रिकी निर्यात या विषयावरील परिषदेत पोलाद राज्यमंत्री कुलस्ते म्हणाले की, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना न जुमानता, आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच देशांतर्गत पोलाद उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत पोलाद क्षेत्राच्या विक्रमी कामगिरीची नोंद घेणे औत्सुक्याचे आहे. 

भारताचा सुमारे 106 दशलक्ष टन पोलादाचा आत्तापर्यंतचा उच्च वापर आणि 120 दशलक्ष टन उत्पादन हे केवळ या क्षेत्राची लवचिकता दर्शवत नाही तर भारतातील पोलाद उद्योजकांचे अनुकरणीय धैर्य आणि दृढनिश्चय देखील दर्शवतात, असे राज्यमंत्री म्हणाले.

पोलाद उत्पादकांनी अर्ध-तयार पोलादाऐवजी मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीवर भर देण्याची सावधगिरी बाळगावी कारण देशातील पोलाद उत्पादन आणि निर्यात याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर तसेच रोजगारावर होतो असे पोलाद राज्यमंत्र्यांनी सांगितले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...