पुणे-शेतकरी, विद्यार्थी, तरुणाई, महिला वर्ग यांच्यासह लहान आणि मध्यम उद्योजक यांच्यासह तळागाळातील विविध घटकांना दिलासा देण्याचे काम केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या संकटातून बाहेर पडत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या योजना निश्चितच देशातील नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.
ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण, रासायनिक आणि कीटकनाशकमुक्त शेतीला प्राधान्य, नवीन ६० लाख नोकऱ्या,शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही वाहिन्या, चालू वर्षात ५ जी सेवेची सुरुवात, मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा यासह अनेक महत्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले आहेत, असेही बिडकर म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पात तळागाळातील विविध घटकांना दिलासा -गणेश बिडकर
Date:

