Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

टोकाचे पाऊल उचलू नका; व्यक्त व्हा!

Date:

समुपदेशकांचे आवाहन; आत्महत्या प्रतिबंधासाठी ‘कनेक्टिंग’ची हेल्पलाइन
पुणे : काही दिवसांपूर्वीची सांगलीच्या म्हैसाळ इथली सामूहिक-कौटुंबिक आत्महत्येची घटना असो की, एका लहान मुलाने मोबाईलवर बघून गळफास लावल्याची घटना असो, अशा घटनांनी आपण विषण्ण होते. ‘आत्महत्या’ हा शब्द कानावर पडला, तरी प्रत्येक मानवी मन अस्वस्थ होते. त्यामुळे आपण कितीही तणावाखाली असलो, तरी टोकाचे पाऊल उचलता कामा नये. मनावरील ताण हलका करण्यासाठी व्यक्त व्हा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या कनेक्टिंग हेल्पलाइनच्या समुपदेशक शिल्पा तांबे, वीरेन राजपूत आणि बींटी मेहता यांनी सांगलीतील या सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. व्यक्त होण्यासाठी कनेक्टिंगच्या मोफत हेल्पलाईनवरील ९९२२००११२२ किंवा ९९२२००४३०५ या संपर्कावर किंवा distressmailsconnecting@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. ही हेल्पलाइन रोज दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत चालू असते.
याविषयी शिल्पा तांबे म्हणाल्या, प्रचंड मानसिक भावनिक ताणामध्ये असलेल्या व्यक्तीची सर्वात मोठी गरज असते, ती त्यांना कोणीतरी ऐकून, समजून घेण्याची. ‘आत्महत्याग्रस्त व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुर्बल असते’ किंवा आपण एखाद्याशी ‘तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात का? असा थेट प्रश्न करणे म्हणजे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार पेरणे होय’. अश्या असंख्य गैरसमजुतींनी समाजाला घेरले आहे, कनेक्टिंगमध्ये ‘ऐकून घेणे’ यावर भर दिला जातो. आपण आमच्याशी जे काही बोलाल ते सर्व गोपनीय ठेवले जाते, शिवाय आमच्याकडून कोणताही सल्ला दिला जात नाही, की आपल्या विषयी, आपल्या अनुभवाविषयी कोणतंही मत, धारणा बनवली जात नाही. आपल्याला आणि आपल्या वेदना समजून घेण्याचा व आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो.”
वीरेन राजपूत म्हणाले, “ज्येष्ठांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ‘भरोसा सेल’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना मदत पुरवली जाते. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यास जवळचे पोलीस स्टेशन त्यांची नियमीतपणे विचारपूस करते आणि त्यांना काही हवे नको तेही पहाते. जागोजागी ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ व ‘विरंगुळा केंद्रही’ आहेत, ज्यांचीही मदत घेता येवू शकते. बोलायला जागा न मिळाल्याने हताश व्यक्तीचा कोंडमारा होतो. तर ते असमाधान न समजल्यामुळे मदत करायची इच्छा असूनही लोक हतबलपणे मागे सरतात. ज्येष्ठांची निराशा पराकोटीला जाते व ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला प्रवृत्त होतात, असे ‘कनेक्टिंग’ संस्थेत काम करत असताना मला जाणवते. निराश अवस्थेतल्या व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे करणे वा त्यांना संवेदनशीलपणे ऐकणारा प्रशिक्षित कान उपलब्ध करून देणे हा ज्येष्ठांच्या आत्महत्या रोखण्याचा एक उपाय असू शकतो. ‘कनेक्टिंग’ संस्था त्याचसाठी सतत काम करते.” 
आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींना किंवा आत्महत्या घडल्यानंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना त्यांच्या वेदनांबद्दल, त्या अनुभवाबद्दल बोलायचे असल्यास आमची दुसरी सेवा ‘सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट’हेल्पलाईन उपलब्ध आहे. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार, शनिवारी दुपारी ३.१५ ते सायं ५.१५ कार्यरत असते. आपण ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएमएस द्वारे किंवा मिस्ड कॉल देऊन मदत घेता येईल, असे बिंटी मेहता यांनी सांगितले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बांग्लादेशी राज्यात आणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या जवळचे ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत.

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी...

बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू:शेतात खेळत असताना आई-वडिलांसमोरच ओढून नेले

शिरूर-जुन्नर सीमेवरील पारगावमधील घटना पुणे- जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या...

पुण्या पिंपरीत महायुती नाही, अजित पवार भाजपा विरोधात लढणार – मुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे- महापालिकेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन...