कॉंग्रेस किंगमेकर -मोहन जोशी
५८ प्रभागात स्वबळाची तयारी- रमेश बागवे
पुणे-इतिहासाच्या जंजाळात लोकांना दिशाभूल करत गुरफटून ठेवण्यात भाजपा मग्न असली तरी कॉंग्रेसने त्यास प्रत्युत्तर जरूर द्यावे परंतु त्यात फार अडकून न पडता लोकांना वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचे वेध घेण्याकडे घेऊन गेले पाहिजे असा सूर आज विविध प्रभागांची रचना करताना केलेल्या मोडतोडी कडे लक्ष वेधताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनात व्यक्त केला हे करताना हायटेक प्रचार करण्यास जुन्यांना बरोबर घेऊन नव्या चेहऱ्यांनी आघाडी घेतली पाहिजे असाही आग्रह यावेळी धरण्यात आला. कॉंग्रेस भवनात शहर अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, आबा बागुल आदी नेत्यांच्या समोर प्रभाग रचनेवरील आक्षेप नोंदविण्यात आले . यावेळी विविध प्रभागातील कार्यकर्त्यांनी देशा च्या हितासाठी कॉग्रेस प्रत्येक प्रभागात आघाडीवर असणे गरजेचे आहे असे मत मांडले . यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी , आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांच्याशी केलेली हि बातचीत .