तरी कॉंग्रेसचे डोळे उघडत नाहीत-पर्वतीतून आबा बागुलांची बंडखोरी (व्हिडीओ)
पुणे- तब्बल सहा वेळा जनतेने निवडून दिले, स्थानिक कुरघोडयांच्या राजकरणात हि विकासाचे असंख्य प्रकल्प राबवून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण …आपल्यापेक्षा कुणाला पुढे जावून द्यायचे नाही या वृत्तीतून नगरसेवक पदापर्यंतच मला रोखण्यात आले. अशा राजकारणातून कॉंग्रेसचे ९० नगरसेवकांचे संख्याबळ ९ वर पोहोचले तरी कॉंग्रेसचे डोळे उघडले नाहीत . पण आता माघार नाही ,घाबरणार नाही आता लढणार ,तुम्ही आहात ना माझ्याबरोबर ? असा सवाल आज आपल्या हितचिंतक नागरिकांच्या मेळाव्यात करत ,मिरवणुकीने जावून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ,माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पर्वती मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या मतदार संघातून त्यांनी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती, काम पहा आणि उमेदवारी द्या असा त्यांचा हट्ट होता . शरद पवार , अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण ,अशोक चव्हाण यासारखी असंख्य नेते मंडळी त्यांच्या विविध कार्यक्रमांना आलेली .. एवढेच काय भाजपच्या तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापटांनी त्यांच्या कामाचे कौतुक केलेले .पण राष्ट्रवादी ने नेहमीप्रमाणे हा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपात स्वतःकडेच ठेव्यात यासह मिळविले आणि आबांच्या नशिबी पुन्हा निराशा आली . अखेरीस आता माघार नाही असे म्हणत आबा बागुलांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद ठेवत आज अखेरच्या दिवशी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पहा तत्पूर्वी आबा बागुल नेमके आपल्या भाषणात काय म्हणाले …..