पुणे- आम्ही चळवळ ,योगदान आणि ज्ञानेश्वर,तुकाराम,गाडगे महाराज अशा अनंत संतांची कास धरली .. आणि या फुकनळ्यांनी राम रहीमसारख्या साधूंची पूजा केली . आम्ही समतेची,मानवतेची विज्ञानाची कास धरली ,यांनी …हिंदुत्वराष्ट्र आणि चमत्कारांची कास धरली .. कॉंग्रेसला ६० वर्षे दिली ,मला ६० महिने तर देवून पहा .. असे सांगणाऱ्या चमत्कारांच्या भाकड गर्जनांवर विश्वास ठेवू नका असे सांगत कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी मोदींसह भाजपच्या नेत्यांवर जोरदार तर केलीच पण त्या बरोबर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हि आज खडे बोल सुनावले .. पुरकेंच्या वकृत्वाच्या विनोदी शैलीने कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार दाद दिली .
पुणे कॅटोंमेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,अनंतराव गाडगीळ ,शहराध्यक्ष रमेश बागवे ,मोहन जोशी, कमल व्यवहारे ,अभय छाजेड,अविनाश बागवे ,अरविंद शिंदे, अजित दरेकर,नीता परदेशी,संगीता तिवारी, विठ्ठल थोरात ,वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर ,एडविन रोबर्ट,माधवराव बारणे,मधुकर चांदणे आदी यावेळी उपस्थित होते .
पंडित नेहरू ,लालबहादूर शास्त्री,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाची कशी प्रगती केली .. देशात काय होते आणि काय बदल कॉंग्रेस ने केला ,या सर्वांचे देशासाठी योगदान काय ? हे सांगत पुरके म्हणाले फुकनळ्यांनी ठोकलेल्या चमत्काराच्या गर्जनांवर तुम्ही विश्वास ठेवला . आता काळ बदलला आहे . नेहरुंनंतर देखील २०/२५ वर्षे वर्षे दगडे उभी केली तरी लोक निवडून देत होते .पण आता इतिहासाच्या आधारावर तुम्हाला लढता येणार नाही .तुम्हाला इतिहास निर्माण करावा लागेल आणि २०१९ च्या निवडणुकीच्या माध्यमातून तो घडविण्याची संधी आहे .कार्यकर्त्यांनी पराकाष्ठा केली पाहिजे .तिकिटे दिली तर कॉंग्रेस नाही तर विरोधात खेचा खेची हे धोरण ताबडतोब थांबविले पाहिजे . कॉंग्रेसने तुम्हाला खूप काही दिले पण आता कॉंग्रेस वाचेल तर देश वाचेल अशी स्थिती आहे . तेव्हा भाकड गर्जनांना तिलांजली देवून देशासाठी काही करायची तयारी म्हणून कामाला लागा असे ते म्हणाले …. नेमके पुरके यांनी काय म्हटले ते पहा आणि ऐका …
(संपर्ण भाषण नाही एडीटेड)