पुणे – एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला म्हणजे सुटले असे नाही …. आता खडसें नंतर गिरीश बापट यांचा नंबर लागेल . साडेचार हजार कोटी रुपयांचा ‘डाळ घोटाळा’ आणि मेपल घरकुल प्रकरणी सामन्यांची फसवाफसवी या दोन प्रकरणात बापट यांच्या कृत्याबाबत सरकारला जाब द्यावा लागेल असे आज येथे प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एकनाथ खडसे यांनी राजीनामा देवून भागणार नाही या प्रकरणी न्यायाधीशांमार्फत चौकशी होवून दोषींना शासन व्हायला हवे तसेच निवडणुकीत वापरलेला पैसा परत करण्यासाठी डाळ घोटाळा करून सामान्यांना ४० ते ७० रुपये दराने मिळणारी डाळ २०० रुपयांवर नेण्यात आली . मेपल घरकुल प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो छापून दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न झाला न्यायाधीशांकरवी या प्रकरणांची चौकशी करून दोषींना शासन व्हायला हवे यासाठी काँग्रेसपक्ष अधिकाधिक आक्रमक होत राहील असे ते म्हणाले . पुण्यातील अमित शहांच्या भाषणावर टीका करताना ते म्हणाले,’ हे जुमलेबाजांचे सरकार आहे आणि त्याचे प्रचारक अमित शहा आहेत . जनतेला चुकीची माहिती देवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत . निवडणुकीपूर्वी २ कोटी रोजगार प्रत्येकवर्षी देवू असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती रोजगार दिलेत हे स्पष्ट करावे ? असे ते म्हणाले