बापटांना बिराजदारी हिसका दाखवून चीतपट करू – मोहन जोशी

Date:

पुणे – पुणे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गिरीष बापट यांनी माझा उल्लेख रेवड्यावरचापहिलवान असा केला. पण
त्यांना सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा इतिहास महिती नसावा. सतपालांना पुण्यात चारीमुंड्या चीत
करणा-या हरिश्चंद्र बिराजदार हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेत राहून मस्तवाल झालेल्या गिरीश
बापटांना आम्ही बिराजदारांचा हिसका दाखवून चारीमुंड्या चीत करू असे खुले आव्हान, पुणे शहर लोकसभा
मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांनी आज संवाद यात्रेच्या सांगता सभेत दिले.
मोहन जोशी पुढे म्हणाले, माझा जन्म खडकमाळा आळीचा, तर माझी जडणघडण चिंचेच्या तालमीत आणि पुणेकरांचा
तालमीत झालेली आहे. या निडणुकीत गिरीष बापट यांना चारीमुंड्या चीत केले नाही तर पुन्हा पुणेकरांसमोर मतं
मागायला येणार नाही. या सभेत बोलताना आमदार अनंतराव गाडगीळ यांनी मोदींच्या स्टाइलने कार्यकर्ते व
नागरीकांना प्रश्न विचारले…….खात्यात 15 लाख जमा झाले का ? रोजगार मिळाला का ? मेट्रो पुण्यातून धावली का ?
वगैरे सर्वच प्रश्नांची उत्तरे “नाही” अशी येत असतानाच मग काहीही न करणा-यांना मतदान करणार का ? असे
विचारताच सर्वांना एक सूरात “नाही” असे सांगितले. राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम यांनी गेल्या वर्षी
पावसाळ्यात धरणे पूर्ण भरलेली असतानाही आपल्याला पुरेसे पाणी केवळ पालकमंत्र्यांमुळे मिळू शकत नसल्याने त्यांना
या निवडणुकीत पराभूत केलेच पाहिजे असे आव्हान केले. शिवाजी गदादे पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या
नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या जोरावर पुण्यातून सर्वाधिक मताधिक्य मोहन जोशी यांना निवडणुकीत देऊ अशी ग्वाही
दिली. या निवडणुकीत उरलेल्या दिवसात कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन आपणच उमेदवार मोहन जोशी आहोत य़ा
भावनतून मतदारांशी संवाद साधावा असे आवाहन नगरसेवक आबा बागूल यांनी केले.
या संवादयात्रेत काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गदादे पाटील, संजय बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे, काँग्रेसचे पर्वती
ब्लॉकचे अध्यक्ष सतीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम, राष्ट्रवादी कसबा ब्लॉकचे अध्यक्ष
विनायक हणमगर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना विठ्ठल हणमगर, शशिकला कुंभार, अमीत बागूल, सतीश कांबळे,
अभिजीत गायकवाड, राजेंद्र पेशने, आनंद बाफना, विकास लांडगे, जयकुमार ठोंबरे, शशिकांत तापकीर, मदन वाणी,
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.
सहकारनगर मधील संत गजानन महाराज मठात दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केले.
देवदर्शनानंतर जवळच्या डॉ. आंबेडकर वसाहतीत कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले. तेथे सर्वांशी संवाद साधल्यावर, मठाच्या
समोरच्या बाजूल असलेल्या वसाहतीत जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दत्तवाडी पोलिस स्टेशन,
लक्ष्मीनगर, पर्वतीगावातून संवाद यात्रा जनता वसाहतीत गेली. आजच्या संवाद यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक वेळ
सुमारे तीन तास मोहन जोशी हे जनता वसाहतीत मतदारांशी संवाद साधत होते. रस्त्यावर जीपमधून तर कुठे
कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. आजच्या संवाद यात्रेत वाद्यांचा दणदणाट सुरूवातीपासून

होता. जनता वसाहतीच्या प्रवेश व्दाराशी उमेदवार येताच शिवाजीराव गदादेपाटील यांनी “ए बजाओ” असे सांगतात
वाद्यांचा आवाज दुपटीने वाढला कारण त्यात आणखी एक वाद्यवृंद सहभागी झाला होता. जनता वसाहतीच्या प्रवेश
व्दारावर संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. महिलांनी त्यांना ओवाळले.
जनता वसाहत आणि लक्ष्मीनगर परिसरात काही ठिकाणी येत्या रविवारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी कार्यकर्ते करत होते. त्यांना जय भीम म्हणत मोहन जोशी यांनी प्रतिसाद देत होते. जनता
वसाहतीत कुठे शिवगर्जना कुठे महाराष्ट्र गर्जना तर कुठे भीम गर्जना करत संवाद यात्रा चालली होती. अनेक ठिकाणी
कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावून अन घोषणा देत स्वागत केले. संवाद यात्रेच्या मार्गावर दुतर्फा काँगेस, राष्ट्रवादी
काँग्रेस व महाआघाडीतील मित्र पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी मतदार, व्यापारी यांनी लिंबूपाणी,
थंडगार पाणी देत होते. जनतावसाहतीतून सिंहगड रोडवर संवाद यात्रेची सांगता छोट्या जाहीर सभेने झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.