भाजपचा विकासाचा विचार फक्त बड्या उद्योगपतींसाठी-खासदार कुमार केतकर

Date:

पुणे- यंदाची निवडणूक ही केवळ दोन उमेदवार किंवा दोन पक्षातील नसून दोन
विचार धारेतल्या विकासाच्या मूलभूत धोरणांमधली लढाई आहे. कॉँग्रेसच्या
विकासाच्या धोरणामध्ये धरणे, आयआयटी यांसारख्या मुद्यांना महत्व आहेच
परंतु त्याबरोबरच सामाजिक न्याय, मानवी विकास दर यालाही तितकेच महत्व
आहे. त्यामुळे कोंग्रेसचा विकासाचा विचार आणि भाजपचा विकासाचा विचार
यामध्ये फार फरक असून भाजपचा विकासाचा विचार हा फक्त बड्या
उद्योगपतींसाठी आहे अशी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे
उमेदवार मोहन जोशी व बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या
प्रचारार्थ आयोजित डॉक्टरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार वंदना
चव्हाण, आमदार शरद रणपिसे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, ऍड. अभय
छाजेड, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. मनोज राका, डॉ रविंद्रकुमार काटकर, डॉ. तोडकर,
डॉ. सुनील जगताप, डॉ. शिवदिप ऊंद्रे, डॉ. सुनीता मोरे डॉ. संभाजी करांडे
पाटील, डॉ. मंगेश वाघ, डॉ. गजानन पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
केतकर म्हणाले, पंडित नेहरूंच्या काळात महामार्ग झाले. राजीव गांधीच्या
काळात नवीन तंत्रज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि टेलिफोन या क्षेत्रात क्रांती
झाली. त्यावेळी देशातील उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी देशात
मोर्चे काढले. कॉंग्रेसने या क्षेत्रात प्रगती केल्यामुळे आज अडीच कोटी भारतीय
इतर देशात चांगल्या पदांवर नोकर्‍या करत आहेत. त्यातून त्यांना आर्थिक
सुबत्ता आली आहे. असे असतानाही हा वर्ग नेहेमी कॉँग्रेसच्या विरोधात गरळ
ओकत असतो. साधारण सन 2000 च्या काळात परदेशात गेलेल्या आणि
आर्थिक सुबत्ता मिळवलेल्या अनिवासी भारतीयांचे नातेवाईक किंवा आईवडील
तिकडे जातात तेव्हाही ते त्यांच्याजवळ तसेच बोलतात आणि ते भारतता
आल्यावर त्यांच्यासारखे कॉंग्रेसबाबत तसेच बोलायला लागतात. कॉंग्रेसने त्यांचे

काय नुकसान केले आहे? असा प्रश्न उपस्थित करत केतकर म्हणाले, ही सर्व
अनिवासी मंडळी कश्मीर प्रश्न, हिंदुत्व आणि अयोध्या याबाबतच बोलतात.
त्यांची आर्थि भौतिक प्रगती कोणाच्या काळात झाली हे ते विसरतात. त्यांचे हे
राजकीय आणि संस्कृतिक अज्ञान आहे. प्रचार हा अज्ञानाचा कसा होवू शकतो हे
अनिवासी भारतीयांकडे दिसते अशी टीका त्यांनी केली. ते उदारमतवाद, देशाची
प्रगती काशी झाली, देशाच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाबद्दल बोलला तयार
नाहीत. हे बेशरम आणि कृतघ्नपणाचे लक्षण आहे असे ते म्हणाले.
१९९९ ते २००० याकाळात देशातील मध्यंवर्गीयांची आर्थिक सुबत्ता कॉँग्रेसच्या
धोरणांमुळे वाढली. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी
अमेरिकेत पाठवले. त्यांना शिक्षण घेवून मोठी पदे मिळाली. त्यातून त्यांची
आर्थिक सुबत्ता वाढत गेली. त्यांची सुबत्ता वाढत असताना इथेही ती वाढत होती.
तेव्हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, आर्थिक स्फोट झाला. मध्यमवर्गातील लोक
नवमध्यम वर्गात गेली. गरीब मध्यमवर्गात गेले आणि तेव्हापासून कॉंग्रेसचा
ह्रास सुरू झाला असे सांगून केतकर म्हणाले, या वर्गाला राहुल गांधींनी जाहीर
केलेल्या न्याय योजनेमुळे आपली आर्थिक सुबत्ता जाणार अशी वाटते.त्यामुळे
हिंदुत्वाच्या, काश्मीरच्या आणि अयोध्येच्या मुद्द्याचे आपल्या आर्थिक सुबत्तेला
कूपन घालण्याचे धोरण या माध्यमवर्गाचे आहे अशी टीका त्यांनी केली. जेवढी
आर्थिक सुबत्ता वाढते तेवढा धर्मवाद वाढत जातो, खोटा राष्ट्रवाद, खोटे
धर्मवादाचे कुंपण स्वत: भोवती ही मंडळी घालून घेतात कारण त्यांना आपण
पुन्हा दारिद्र्य रेषेखाली जातो की काय अशी भीती त्यांना वाटते. देशातील सर्व
प्रश्न सुटले असे कॉंग्रेसने कधीच म्हटले नाही. आपल्यायला यापुढे आणखी
कायकरायचे अशीच भाषा कॉँग्रेसच्या पंतप्रधंनांची असायची. त्यामुळे यंदाची
निवडणूक ही केवळ दोन उमेदवार किंवा दोन पक्षातील नसून दोन विचार
धारेतल्या विकासाच्या मूलभूत धोरणांमधली लढाई आहे याचा विचार करून
कॉंग्रेस –राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन
त्यांनी केले.

पुणे शहर कॉंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रवींद्रकुमार काटकर यांनी प्रास्ताविक
करताना डॉक्टर व्यवसाय समोरील असणारी आव्हाने, डॉक्टरांची असणारी
असुरक्षितता, बोगस डॉक्टरांवर न होणारी कारवाई, डॉक्टर पेशंट संबंध
सुधारण्यासाठी काय पवले उचलता येतील याबद्दल आपले मत व्यक्त केले.
डॉ. सुनील जगताप म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर त्यांना बारामती वरून स्क्रिप्ट
येते अशी टीका केली जाते. परंतु त्यांनी जे व्हिडीओ दाखवले ते चुकीचे
आहेत, हे सोशल मीडियावर कुठेच आले नाही. मार्डच्या डॉक्टरांनी स्टायपेंड,
हॉस्टेल संदर्भात संप केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि आरोग्य
मंत्र्यांनी त्यांचे प्रश्न समजावून घेण्यापेक्षा त्यांना कमी करू, कारवाई करण्याच्या
दम दिला. डॉक्टरांना या सरकारच्या काळात अत्यंत त्रास झाला आहे. त्यामुळे हे
सरकार सत्तेवरून घालवावे लागेल. नाहीतर आपल्याला प्रॅक्टिस करणे अवघड
होईल. हॉस्पिटलसाथी त्यांनी क्लिष्ट नियम आणलेत ते शक्य नाही त्यामुळे
सरकार बदलणे आवश्यक आहे असे ते म्हणले.
डॉ. नरेंद्र काळे म्हणाले, डॉ. मनोज राका, डॉ. रवींद्र काटकर, डॉ. सुनीता
मोरे,डॉ. सतीश देसाई इत्यादी यांनी मोदी सरकारच्या आणि युतीच्या काळात
वैद्यकीय क्षेत्राबद्दलची असंवेदनशीलता याबाबत नाराजी विकत करत
आघाडीच्या उमेदवारांच्या मागे उभे उभे राहण्याचे आवाहन केले. ऍड. अभय
छाजेड यांचीही यावेळी भाषणे झाली.
सूत्रसंचालन संभाजी करांडे पाटील यांनी केले तर आभार डॉ. मंगेश वाघ, डॉ.
गजानन पाटील यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...