प्रज्ञासिंह ठाकूरसारखी प्रवृत्ती मतदानातून ठेचा

Date:

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सरकारच उल्लेख व्यक्तिगत नावाने करतात. भाजपचे सरकार म्हणण्याऐवजी ते मोदी सरकार असा उल्लेख करतात. आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी कधी सरकारचा उल्लेख स्वत:च्या नावाने केल्याचे ऐकिवात नाही. अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्यात येथे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरु होते. त्याची प्रचीती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर ती भाजपच्या विरोधात मतदान करून ठेचा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शरद रणपिसे, आमदार विश्वजित कदम, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, रशीद शेख, नगरसेवक अविनाश बागवे, मौलाना निजामुद्दीन,
शालक पाटील, राजेंद्रसिंग वालिया, मौलाना काझमी,अमीर शेख, नदीम मुजावर, राजू इनामदार, राजेंद्र नायर, अय्याज खान, शामला सरदेसाई आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल जे निषेधार्ह वक्तव्य केले त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पाटील यांनी केली. भाजप प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगते. परंतु त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या उमेदवार नसत्या तर ते त्यांचे वैयक्तिक मत झाले असते. त्यामुळे त्याला भाजपच जबाबदार आहे. करकरेनी देशासाठी बलिदान दिले आणि प्रज्ञा ठाकूर त्यांना शाप दिल्याची भाषा करतात. ही
प्रवृत्ती भाजपच्या विरोधात मतदान करून ठेचून काढा असे आवाहन त्यांनी केले. उद्या ते सत्तेवर येऊन कायद्याचा गैरवापर करतील. त्यातून समाजाला जो त्रास होईल त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल पाटील यांनी केला.
कॉंग्रेसने कधी जाती-पंथाचा विचार केला नाही. यावेळी मतदान करताना आपण चुकलो किंवा दुर्दैवाने आपल्याला अपयश आले तर अशा सभा किंवा निवडणुका आपल्याला बघायला मिळणार नाहीत अशी भीती त्यांनी वयक्त केली.
मोदी हिटलरचे पुस्तक वाचूनच सत्ता राबवता आहेत. २०१४ ला मोदींकडे पाहून जनतेने मतदान केले. मात्र आता वातावरण वेगळे आहे. ज्यांनी नोटबंदी आणली त्यांना वोटबंदी आपल्याला करावी लागेल असे सांगून ते म्हणाले, गेल्या
पाच वर्षात जेवढा सामाजिक ताण-तणाव वाढला आहे. तो मी आयुष्यात कधी पहिला नाही. सच्चर आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुर्दैवाने
२०१४ ला आमची सत्ता गेली आणि भाजपने मुस्लीम समाजाचे आरक्षण काढून घेतले. पुढील पिढीच्या भाविताव्यासाठी कोणाबरोबर जायचे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. आता ही लढाई इसपार
या उसपार होवून जाऊ द्या असे आवाहन पाटील यांनी केले.
उल्हास पवार म्हणाले, ही निवडणूक केवळ मोहन जोशी यांना निवडून देण्याकरता नाहे तर देशाच्या लोक्शीची ही निवडणूक आहे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. ज्यांचा सामाजिक ऐक्यावर, सर्वधर्म समभावावर , पुरोगामित्वावर
विश्वास आहे त्यांना मतदान न करण्याची चूक आपण केली तर देशात पुन्हा निवडणूक होईल की नाही अशी स्थिती आहे.मोदी सरकारच्या काळात माणसे एकमेकांकडे संशयाने बघायला लागली आहेत. एका धर्माचेच राज्य देशात आहे असे वाटते. देशाचे ऐक्य धोक्यात आले आहे. बोलण्याचा, स्वत:च्या धर्माचा पालन करण्याचा अधिकार हिसकावून घेतला जात आहे. त्यामुळे याचा विचार करून मोहन जोशी यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.
शरद रणपिसे म्हणाले, मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. उच्च न्यायालयाने तो मान्य केला होता. मात्र, त्याचा जो अध्यादेश काढायचा तो भाजप-सेनेच्या सरकारने बहुमताच्या जोरावर नाकारला.
ज्यांनी हा अध्यादेश पास होऊ दिला नाही त्यांना त्यांची जागा मतदानातून दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. मुस्लीम व दलित समाजावर हल्ले होत आहेत. मॉब लीचींगचे अनेक प्रकार घडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मोदी सरकारला सत्तेवरून घालवले पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, महाराष्ट्राला व देशाला सुरक्षित करण्यासाठी महाआघाडीचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. गेल्या पाच वर्षात जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. बेरोजगारी, दलितांवरील,
अल्पसंख्यांकांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. हा लोकशाहीला धोका आहे. देशात हुकुमशाही आणण्याचे षड्यंत्र सुरु आहे. भावी पिढीच्या भाविताव्यासाठी भाजपला सत्तेवर येण्यापासून सर्वांनी रोखले पाहिजे असे आवाहन करत मोहन जोशी यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
अंकुश काकडे म्हणाले, यंदाची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याचा विचार केला आहे. आपल्यातील मतभेदाचा फायदा जातीवादी शक्तींना होऊ न देण्यासाठी दोन पावले मागे येऊन पुरोगामी शक्तींना या दोन नेत्यांनी एकत्र आणले आहे. मोदींच्या भूलथापांना आपण बळी पडलो आहोत याची जाणीव लोकांना झाली आहे..
रमेश बागवे म्हणाले, मुस्लीम, दलित,ख्रिश्चनांवरील अत्याचार वाढले आहेत. दलित आणि मुस्लिमांनी काय खायचे हे पंतप्रधान मोदींना विचारून ठरवावे लागत आहे. त्यामुळे याचे उत्तर त्यांना २३ तारखेला मोहन जोशी यांना मतदान
करून द्या असे आवाहन त्यांनी केले. मौलन निजामुद्दीन म्हणाले, आपल्या मताची किमत लक्षात घ्या. गेल्या पाच वर्षात लोकांचे अधिकार दाबले जात आहेत.
आवाज दाबला जात आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्याला धमक्या दिल्या जात आहेत. त्यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे तुमचे मत. मुस्लीम महिलांच्या तलाकच्या मुद्याबाबत बोलताना भाजप मुस्लीम महिलांच्या दू:खाचे भांडवल
करतात. मात्र, गोध्रा हत्याकांडात ज्यावेळी गरोदर महिलांची आणि त्यांच्या पोटातील अपत्यांची हत्या झाली त्यावेळीत्यांना मुस्लीम महिलांचे दू:ख दिसले नाही का असा सवाल त्यांनी केला. शालक पाटील यांचीही
यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू इनामदार यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...