पुणे :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल व पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल तर्फे ” डॉक्टर्स डे ” निमित्त उल्लेखनीय कामगिरी बद्दल डॉक्टरांचे अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे सातारा रोड, पुणे येथे सन्मान करण्यात आले. या प्रसंगी शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,तसेच उल्हास पवार , मोहन जोशी, अभय छाजेड , नीता रजपूत, डॉ. मनोज राका ( प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल ), पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल चे अध्यक्षडॉ. रविंद्र कुमार काटकर. पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल चे पदाधिकारी डॉ. गजानन पाटील, डॉ. संभाजी करंडे,डॉ. मंगेश वाघ, डॉ. मनोज फडणीस, डॉ. योगेश गायधनी, डॉ. सतीश जगताप, डॉ. प्रवीण दरक, डॉ. विजय माने, उत्यादी उपस्थित होते. एकूण २३ जनरल प्रॅक्टिशनर व कंसल्टंट असे विविध डॉक्टरांचे स्मृतिचिन्न देऊन सत्कार करण्यात आले.
रमेश बागवे म्हणाले. डॉक्टर्स जसे आमची सेवा करतात तशी त्यांनी सुद्धा आपल्या स्वस्थतेची काळजी घेतली पाहिजे. आपण असाल तर सेवा देतायेईल.
अभय छाजेड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. ते म्हणाले,’ आपले आरोगयाचे हे डॉक्टर मनापासून काळजीपूर्वक इलाज करतात, आपण निरोगी राहावं त्या साठी आपल्याला मार्गदर्शन करतात, आपली सेवा करतात, आपणही त्याची किंमत केली पाहिजे, त्याचा मन सन्मान केला पाहिजे.
उल्हास पवार यांनी सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डे दिनाचा शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले डॉक्टर हे दिवस आहे का रात्र बघत नाही, आपली पेशंटची पूर्ण काळजीपूर्वक सेवा करतात. त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.