पुणे-आधुनिक भारताच्या वाटचालीत काँग्रेसचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री व काँग्रेस पक्षाचे नेते वसंत पुरके यांनी केले . सोमवार पेठमधील संत गाडगे महाराज मठामध्ये पुणे कॅन्टोन्मेट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्याच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी सांगितले कि , २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशाच्या जनतेला अनेक आश्वासने दिली . परंतु , हि सर्व आश्वासने पोकळ ठरली . यु पी ए सरकारच्या कारकिर्दीत देशाच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये माहितीचा अधिकार , शिक्षण हक्क कायदा , अन्नधान्य सुरक्षा व वस्तू सेवा कर कायदा (जी. एस. टी.) असे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या . स्वत्रंत्र मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले . भाक्रानांगल धरण प्रकल्प , नॅशनल डिफेन्स अकादमी , हिंदुस्थान ऍरनॉटिक्स लिमिटेड , भिलाई स्टील प्लांट , हिंदुस्थान अँटिबायोटिक्स सारखे मोठे प्रकल्प उभारले . स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी गोरगरिबांच्या हितासाठी २० कलमी कार्यक्रम बँकेचे राष्ट्रीयकरण व देशाच्या सुरक्षेसाठी पोखरण अणुचाचणी व १९७१ ला पाकिस्तानशी युध्द जिंकून बांगलादेशची निर्मिती केली . स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती आणली . विज्ञान , तंत्रज्ञानावर भर दिला . त्यामुळे भारत जगामध्ये नावलौकिक झाले . आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचा सिहांचा वाटा आहे .
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले कि , पुणे शहराचा विकास काँग्रेस पक्षामुळे झाला आहे . त्यामुळे काँग्रेस पक्षाला गतवैभव आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे . या मतदार संघामधून काँग्रेस पक्षाला मताधिक्य प्राप्त होते . मोदी सरकारच्या राजवटीत सामान्य जनतेला दिलासा मिळालेला नाही . या सरकारमुळे सामान्य लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . सध्याच्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी २५२ अध्यादेश काढले . या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षणाचा विनोद झाला आहे . कर्नाटकाच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने घटनेची पायमल्ली केली . सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपनंतर कर्नाटकामध्ये काँग्रेस जनता दलाची सत्ता आली . कर्नाटकामध्ये भाजपने लोकशाहीचा एन्काऊंटर केला आहे . भाजपने देशामध्ये लोकशाहीचे राज्य आणले आहे .
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे यांनी सांगितले कि , मोदी सरकारला उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचवा . आपापसामधील गटतट मिटवून काँग्रेस पक्षाचे काम जोमाने करा .मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आज शेतकरी शेतमजूर कामगार व गरीब जनता हवालदिल झाला आहे . येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत जनता बी जे पी ला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही . कार्यकर्त्यांनी मतदारापुढे साठ वर्षात काँग्रेस पक्षाने देशाच्या प्रगतीसाठी केलेले काम पोचवावे . जेणेकरून जनतेमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या बाबतीत विश्वास निर्माण होईल . आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला निवडून आणतील .
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले .
या मेळाव्यास आमदार अनंत गाडगीळ , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी , अभय छाजेड ,अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे ,मनपा गटनेते अरविंद शिंदे , माजी नगरसेवक शिवाजी केदारी , प्रांतिक प्रतिनिधी सदानंद शेट्टी , नीता रजपूत , शानी नौशाद , नगरसेविका लता राजगुरू , सुजाता शेट्टी , चाँदबी नदाफ , नगरसेवक रविंद्र धंगेकर .महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयचे अध्यक्ष अमीर शेख , पुणे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रमेश अय्यर , संगीता तिवारी , नुरुद्दीन सोमजी ,सुजित यादव , विठ्ठल थोरात , रशीद खिजर , वाल्मिक जगताप , भगवान धुमाळ , पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा युवक अध्यक्ष साहिल केदारी , भवानी ब्लॉक अध्यक्ष सुनील घाडगे , पुणे स्टेशन ब्लॉक अध्यक्ष मीरा शिंदे , पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष प्रदीप परदेशी , सुनील दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्याचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर आभार नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले .

