पुणे-“एम्प्रेस गार्डन’च्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थानासाठी इमारती बांधण्याचा घाट सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली . ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, एम्प्रेस गार्डन चे मंद सचिव सुरेश पिंगळे यांना यावेळी अक्षरशः घेरी (चक्कर )आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुगणालयात पाठविण्यात आले .
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,आबा बागुल,मनीष आनंद,मोहन जोशी, अभय छाजेड , सोनाली मारणे, संदीप मोकाटे, प्रा. जगताप,रमेश अय्यर,संगीता तिवारी,सतीश पवार, चंद्रशेखर कपोते आदी मान्यवर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते
ब्रिटिशकालीत ५५ एकरातील एम्प्रेस गार्डन सध्या सदतीस एकर झाले आहे.त्यातील तब्बल साडेदहा एकर जागेवर इमारती बांधण्याची योजना सरकारने आखली आहे. या जागेवर तीन शासकीय इमारती बांधण्यात येणार असून, त्यामध्ये सरकारी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी; तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थान म्हणून त्यांचा वापर करण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रियाही करण्यात आली असून, त्यासाठी चार कोटी 85 लाख रुपये खर्च येणार आहे.
एम्प्रेस गार्डन हा शहराचा श्वास आहे त्याच्या झाडाचा पालापाचोळा हि तोडू देणार नाही, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वाट्टेल ती किंमत आम्ही मोजू असा निर्धार यावेळी रमेश बागवे यांनी व्यक्त केला. पहा आणि ऐका ..या आंदोलनाची एक हलकीशी झलक ..

