पुणे-काँग्रेस सेवा दल तर्फे ” ९४ वा दलदिन ” सेवादल तर्फे अनेक खेळ स्पर्धा काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आले. रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते स्व. डॉ. ना. सु. हार्डीकर ( काँग्रेस सेवादल संस्थापक ) यांना पुष्पहार अर्पण करून तर अभय छाजेड ( चिटणीस महाराष्ट्र प्रदेश ) यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात अली.
या प्रसंगी सेवा दल मोठ्या संख्याने उपस्थित होते. २०० मुले, मुलींनी विविध स्पर्धेत भाग घेतला.रविंद्र म्हसकर ( मुख्य संघटक ), अर्जुन लोणंदकर, राजू गायकवाड, शोभा रजपूत, रंजना रजपूत, शीला रजपूत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.