पुणे- शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी छाया बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिले . छाया बाळासाहेब जाधव या रेणुका महिला बचत गटाच्या संस्थापिका असून महिला पोलिस दक्षता कमिटीमध्ये सदस्य , राष्ट्रीय मजदूर सेवा संघ घरेलू कामगार लोकप्रतिनिधी , पुणे महापालिका नागरवस्ती विकास योजनेच्या निमंत्रक , मानव अधिकार संघटनाचे कार्याध्यक्षपदावर कार्यरत आहेत .
या पदाच्या माध्यमातून आपण काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहचवून काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे छाया बाळासाहेब जाधव यांनी सांगितले .