पुणे- स्वतःचा बडेजाव मिरवण्यापेक्षा गोरगरिबांची आणि कार्यकर्त्यांची कामे करा, त्यांना सांभाळा , केवळ विशिष्ट प्रसिद्धीमाध्यमे हाताशी धरून गटबाजी करून,स्वार्थ साधूनही,कॉंग्रेसची बदनामी करून ,अप्रत्यक्षपणे मनुवादी भाजपला मदत करू नका असा सणसणीत इशारा आज कॉंग्रेसच्या साप्ताहिक बैठकीतून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्याच पक्षातील काही तथाकथित नेत्यांना दिला .
प्रांतिकच्या समितीवर प्रतिनिधींच्या नेमणुकांच्या संदर्भात विश्वजित कदम ,संजय बालगुडे आणि अनंतराव गाडगीळ यांनी शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षांविरोधात शड्डू ठोकून वरिष्ठांकडे जावून आपापली वर्णी लावून घेतल्याच्या बातम्या पुण्यातील विशिष्ट प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केल्या होत्या .यामुळे शहर कॉंग्रेस मध्ये गटबाजी सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले .या पार्श्वभूमीवर आज झालेल्या साप्ताहिक बैठकीत याचे पडसाद उमटले.बाळासाहेब शिवरकर ,कमल व्यवहारे, नीता परदेशी,अजित दरेकर, अविनाश बागवे राजूशेठ डांगी,राजू साठे,विठ्ठल थोरात आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यावेळी तुडुंब गर्दी केली होती . यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी नेत्यांमधील गटबाजी बाबत नाराज व्यक्त केली .अनेक जन कॉंग्रेसच्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेसपासून 2 हाथ लांब राखून होते . नांदेड च्या घवघवीत यशानंतर , ते आता गर्दी करू लागले आहेत .
यावेळी रमेश बागवे म्हणाले कि ,यांना पदेच हवी होती तर मला सूचना करायची होती , थेट वर जाण्याची आवश्यकता भासली नसती.केवळ ईगो मुळे ‘ही’मंडळी थेट वरिष्ठांकडे जावून येतात .’ दलित असलो म्हणून काय झाले … मलाही सोनिया गांधी,राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांनीच अध्यक्ष केले ,त्यांचा मान ठेवून तरी मला सूचना करायची.मोठ्ठे नेते आहात तुम्ही ,कित्येक वर्षे कॉंग्रेसमध्ये काम करीत आहात , पदाधिकारी आहात ,होतात ,मग कॉंग्रेसच्या कठीण अवस्थेत कॉंग्रेस भवनात येणे , कार्यक्रम राबविणे, जनहितासाठी रस्त्यावर उतरणे याबाबत आपण का मागे रहायचे ? आता जनतेला कळून चुकले आहे , कि फसव्या भाजपला धर्मनिरपेक्ष असलेला कॉंग्रेसच रोखू शकतो ,अशा काळात केवळ स्वार्थासाठी, गटबाजी चव्हाट्यावर मांडून, या पक्षाचे नुकसान करू नका ,अन्यथा मी तुमच्यावर कारवाई साठी वरिष्ठांकडे जावू शकतो, हे ध्यानात घ्या असा देखील इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे दिला .पहा आणि ऐका नेमके रमेश बागवे यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …