पुणे- शहर कॉंग्रेस मध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असून , त्याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजपने अशोभनिय फलक लावले, असा आरोप काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुण्यात केला. काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे, असे बागवे यांनी म्हटले आहे. तर आगामी लोकसभेसाठी विश्वजित कदम यांच्या नावाला आमची पसंती असल्याने असे प्रकार होत असल्याचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले . ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन विश्वजित कदम यांना सांगलीला जाण्याचा सल्ला देणारे फलक पुण्यात लागले होते. या फलकबाजीच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी निषेध व्यक्त केला.
आपण शहर अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणुकीसाठी कदम यांच्या सहाय्याने जोरदार मोहीम राबविली आणि निवडणुकीनंतर भाजपचा मुखवटा खेचून काढणारी जोरदार अशी असंख्य आंदोलने केली . विश्वजित कदम हे अनेक आंदोलनात सहभागी झाले . त्यांच्यावर काँग्रेसपक्षाला पूर्णपणे विश्वास आहे’, असेही बागवे म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते.
दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पुण्याच्या दौऱ्यावर असताना कदम ,बागवे त्यांच्यासमवेत होते . याच वेळी कदम यांच्याबद्दल ..तुच आहे पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार ‘ अशा शीर्षकाचे फलक लावण्यात आले होते . हे फलक भाजपच्या कारस्थानाचा भाग आहे असा आरोप करीत आज शहर कॉंग्रेस कार्यकारिणी ,नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्यावर एकमुखी पाठींबा व्यक्त करण्यात आला.पहा हि पत्रकार परिषद …