पुणे- ८ ऑगस्ट १९४२ ला कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या विरोधात ‘चले जाव ‘ च्या आंदोलनाचा निर्णय घेतला . आणि तेव्हापासून सुरु झाला स्वातंत्र्यासाठी अंतिम टप्प्यातील लढा … या लढया च्या आठवणी जागे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेस च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज निवृत्त ले . जनरल मोती धर यांच्या हस्ते झाले . हे प्रदर्शन ९ ऑगस्ट अखेर पर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे .
कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे , तसेच म. वि अकोलकर ,अभय छाजेड, मोहन जोशी , अविनाश बागवे,अजित दरेकर, राजूशेठ डांगी ,अमित बागुल ,चंद्रशेखर कपोते ,विठ्ठल थोरात, रवी म्हसकर, रवींद्र भिंगारे, संजय सोनावणे,अरुण गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.